परभणीत भाजीपाला-फळांची आवक वाढली, दरावर प्रभाव

परभणी येथील फळे -भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्यामुळे मार्केटमधील आवकेत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे.
परभणीत भाजीपाला-फळांची आवक वाढली, दरावर प्रभाव
परभणीत भाजीपाला-फळांची आवक वाढली, दरावर प्रभाव

परभणी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतकरी परभणी येथील फळे -भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्यामुळे मार्केटमधील आवकेत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२४) चार ते पाच पट अधिक आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. येथील मार्केट मध्ये भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची सात हजार क्रेटपर्यंत आवक होत असून प्रतिक्रेटचे दर ३० ते ५० रुपये पर्यंत कमी झाले आहेत. कोथिंबीर, फ्लॉवर, हिरवी मिरची, कारली, काकडी, वांगी, दुधी भोपळा आदी भाजीपाल्याची आवक वाढली असून प्रतिक्विंटलच्या दरामध्ये ६०० ते १००० रुपयांनी घट आली आहे. संत्र्यांना मागणी असून दरही स्थिर आहेत. मोसंबीला मागणी नाही दर कमी आहेत. टरबूज, खरबुजाची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली. मंगळवारी (ता.२४) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १०० ते ४०० रुपये होते. कांद्याची आवक घटली. आठवड्यातील प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी येथील मार्केटमध्ये कांदा, लसूण, आले, बटाटे यांची आवक होत असते. कांद्याची सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यातून लसणाची मध्य प्रदेशातून तर बटाट्याची आग्रा येथून आवक होते.शनिवारी (ता.२१) कांदा, बटाट्याची ५० टक्के आवक झाली होती.मंगळवारी (ता.२४) आवक झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com