agriculture news in marathi vegetable incoming increases in parbhani | Page 2 ||| Agrowon

परभणीत भाजीपाला-फळांची आवक वाढली, दरावर प्रभाव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

परभणी येथील फळे -भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्यामुळे मार्केटमधील आवकेत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे.

परभणी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतकरी परभणी येथील फळे -भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्यामुळे मार्केटमधील आवकेत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२४) चार ते पाच पट अधिक आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

येथील मार्केट मध्ये भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची सात हजार क्रेटपर्यंत आवक होत असून प्रतिक्रेटचे दर ३० ते ५० रुपये पर्यंत कमी झाले आहेत. कोथिंबीर, फ्लॉवर, हिरवी मिरची, कारली, काकडी, वांगी, दुधी भोपळा आदी भाजीपाल्याची आवक वाढली असून प्रतिक्विंटलच्या दरामध्ये ६०० ते १००० रुपयांनी घट आली आहे. संत्र्यांना मागणी असून दरही स्थिर आहेत. मोसंबीला मागणी नाही दर कमी आहेत. टरबूज, खरबुजाची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली.

मंगळवारी (ता.२४) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १०० ते ४०० रुपये होते. कांद्याची आवक घटली. आठवड्यातील प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी येथील मार्केटमध्ये कांदा, लसूण, आले, बटाटे यांची आवक होत असते. कांद्याची सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यातून लसणाची मध्य प्रदेशातून तर बटाट्याची आग्रा येथून आवक होते.शनिवारी (ता.२१) कांदा, बटाट्याची ५० टक्के आवक झाली होती.मंगळवारी (ता.२४) आवक झाली नाही.


इतर ताज्या घडामोडी
कळमना बाजार समितीत व्यवहार ठप्पनागपूर  ः कळमना बाजार समितीत धान्य...
नियंत्रण आंबा फळगळीचेसद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...