पुण्यात भाजीपाला आवक सुरळीत; दर स्थिर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थोडी उघडीप दिल्याने आवक सुरळीत झाली आहे.
Vegetable inflows smooth in Pune; Rate fixed
Vegetable inflows smooth in Pune; Rate fixed

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थोडी उघडीप दिल्याने आवक सुरळीत झाली आहे. आवक आणि मागणी सुरळीत असल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ टेम्पो, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून घेवडा ३, तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती आवक झाली होती. तर भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, स्थानिक मटार ७०० गोणी, तांबडा भोपळा सुमारे १० टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर कांदा ६० ट्रक आवक झाली होती; तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा : १५०-१९०, बटाटा : ९०-१३०, लसूण : ४००-१०००, आले : सातारी १२०-२२०, भेंडी : २००-३००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : १५०-३००, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : २००-३००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १२०-१३०, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ६०-१००, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १४०-१६०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : २००-३००, गाजर : १६०- १८० वालवर : ३००-४००, बीट : ६०-१००, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार - ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१६०-१८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर  पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे एक लाख ७५ हजार तर मेथीच्या २० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - ३००-१०००, मेथी -१०००-२०००, शेपू ३००-६००, कांदापात ६००-९००, चाकवत -६००-८००, करडई ३००-६००, पुदिना १००-३००, अंबाडी - ५००-६००, मुळे - ७००-१२००, राजगिरा - २००-४००, चुका ५००-८००, चवळई - ३००-५००, पालक ६००-१०००. फळ बाजारात रविवारी (ता. ८) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ४० टन, मोसंबी ५० टन, संत्रा १ टन, पपई १२ टेम्पो, चिकू १ हजार ५०० गोणी आणि पेरूची सुमारे ५०० बॉक्स आणि क्रेट, सीताफळ १० टन, कलिंगड २ टेम्पो आवक झाली होती.  फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : १५०-२५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२००, (४ डझन) : ३० -१२०, संत्रा : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २५-१३०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : १५-२५ खरबूज : २५-३० पपई : १२-२२, चिकू (१० किलो) ८०-४००, पेरू (२० किलो): ३००-४०० 

फुलबाजार  सोमवार (ता. ९) पासून श्रावण महिना सुरू होत असल्याने विविध फुलांना मागणी वाढली आहे. मात्र कोरोना निर्बंध शिथिल होऊन, मंदिरे उघडण्याच्या शक्यतेने फुलांच्या दरात वाढीच्या आशा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना आहे. दरम्यान, विविध फुलांची थोडी दर वाढ झाली आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१५०, ॲस्टर (५ जुड्या) ः २०-३०, सुट्टा ८०-१२०, कापरी : २०-५०, शेवंती : २५- ५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०- १२०, शेवंती काडी ८०-१५०, लिलीयम (१० काड्या) ८००-११००, ऑर्चिड ४००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ४०-७० मोगरा २५०-३५०. 

मटण-मासळी  पापलेट, सुरमई, हलवा, रावस तेजीत आहे. आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस आणि अमावास्येमुळे मटण, मासळी, चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली. सोमवारपासून (ता. ९) श्रावण महिन्याचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे चिकन, मटण खरेदीसाठी रविवारी (८ ऑगस्ट) बाजारात गर्दी झाली होती. मागणी वाढल्याने पापलेट, सुरमई, हलवा, रावस, वाम या मासळीचे दर तेजीत होती. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे २० टन, खाडीची सुमारे ५०० किलो, नदीची मासळी दीड टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची सुमारे २५ टन आवक झाली होती. अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) पापलेट : पापलेट : कापरी : १५००-१८०० मोठे १५००-१६००, मध्यम : १०००-१२००, लहान ९००-१३००, भिला : ७००, हलवा : ७००-९००, सुरमई : ८००-१०००, रावस : लहान ८००-११००,  मोठा : १२००, घोळ : ८००-९०० करली : ४००, पाला : ८००-१२००, वाम : पिवळी : ११००, काळी १२००, ओले बोंबील : २००-२८०, 

कोळंबी : २८०, मोठी ४००-५५०, जंबो प्रॉन्स : ११००-१२००, किंग प्रॉन्स : ७५०-८०० लॉबस्टर : ८००-१०००, मोरी : २४०-३६०, खेकडे  : २००-२८०, चिंबोऱ्या : ४८०-६००. 

खाडीची मासळी : नगली : ५५०-६००, तांबोशी : ४००, बांगडा : २००-२४०, शेवटे १६०-२८०, तिसऱ्या : २४०, खुबे : १४०. 

नदीची मासळी : रहू : १००-१६० कतला : १००-१६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०, खवली : २५०, आम्ळी : १६०, खेकडे : २००-२४०,वाम : ५००-५६० 

चिकन : चिकन : २१०, लेगपीस : २५०, जिवंत कोंबडी : १६०, बोनलेस : ३६०. 

अंडी : गावरान : शेकडा : ८३० डझन : १०८  प्रति नग : ९,  इंग्लिश : शेकडा : ४८२ डझन : ६० प्रतिनग : ५  

मटण : बोकडाचे : ७०० बोल्हाईचे : ७०० खिमा : ७००, कलेजी : ७४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com