Agriculture news in marathi Vegetable market in Kolhapur closed | Agrowon

कोल्हापुरातील भाजी मंडई, रस्त्यावरील भाजी विक्रीही बंद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोल्हापूर : सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना पायदळी तुडविली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई आणि रस्त्यावरील भाजी विक्रीही बंद केली आहे.

कोल्हापूर : सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना पायदळी तुडविली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई आणि रस्त्यावरील भाजी विक्रीही बंद केली आहे. यापुढे टेम्पोतून अथवा हातगाडीतून प्रत्येक कॉलनी अथवा गल्लोगल्ली हातगाडी नेऊनच भाजी विक्री करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. 

या नियमांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष्मीपुरी, पिलतीर्थसह सर्व भाजी मंडई उठविल्या आहेत. ‘कोरोना’चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. चार विभागीय कार्यालयांतर्गत मुख्य रस्त्यावर अंतर ठेवून पट्टे मारून भाजी विक्रेत्यांना बसविले होते.

भाजी विक्री व किराणा विक्रीच्या ठिकाणी नागरिकांनी ठराविक अंतरावर उभे राहावे, यासाठी गोलाकार, चौकोन केले आहेत. परंतु, मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. 

या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना टेम्पोमधून अथवा हातगाडीतून मुख्य चौकात, गल्लीत, उपनगरात भाजी विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन विक्रेत्यांमध्ये कमीत कमी शंभर फुटांचे अंतर ठेवणे जरुरीचे केले आहे. 

बंद राहिलेल्या मंडई 

  • कपिलतीर्थ मार्केट, महाद्वार रोड 
  • पाडळकर मार्केट, ऋणमुक्तेश्‍वर (शाहू उद्यान) गंगावेश 
  • रविवार पेठ, लक्ष्मीपुरी 
  • शिंगोशी मार्केट (मंगळवार पेठ) 
  • रेल्वे फाटक (शाहूपुरी) 

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...