नगर जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर भाजीपाला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात अजूनही फारशी भाजीपाला लागवड झालेली नाही. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाली आहे. यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी साठवण झाली नाही. विहिरी, विंधनविहिरींनाही पुरेसे पाणी आलेले नाही. त्याचा भाजीपाला लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. दुष्काळाच्या झळा सोसलेल्या तालुक्यांमध्ये भाजीपाला लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यातील काही भागांत पावसाळा सुरू होण्याआधी महिनाभर तर काही भागांत पावसाळा सुरू झाला की जुन-जुलैमध्ये भाजीपाला लागवड होत असते. त्यामुळे साधारण सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात बाजारात भाजीपाल्याची विशेषतः कोबी, फ्लॉवर, बटाटे, वांगी, भुईमूग शेंगांची आवक होत असते. यंदा मात्र भाजीपाल्याच्या लागवडीवर गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याचा आणि यंदाच्या पावसाळ्यातही पुरेसा पाऊस नसल्याचा परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे पाणीच उपलब्ध नसल्याने यंदा उन्हाळ्यात मे-जून या काळात भाजीपाला लागवड झाली नाही आणि पावसाळा सुरू होऊनही अनेक भागांत अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पावसाळ्यात लागवड झाली नाही.

आतापर्यंत ११ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाली आहे. त्यात नगर तालुक्यात ३६०, पारनेर तालुक्यात १७४, श्रीगोंद्यात ४२९, कर्जतमध्ये ७६४, जामखेडला १९०, पाथर्डीत ३६३, नेवाशात ५८४, राहुरीत ६६९, संगमनेर तालुक्यात ३२८१, अकोल्यात ३५२८, कोपरगावात ५६९, श्रीरामपुरात १०४, राहात्यात ५३३ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाली आहे. 

जिल्ह्यात अकोले, संगमनेर तालुक्यात भाजीपाल्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. आता मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यात पाऊस चांगला पडू लागला असल्याने रब्बीत मात्र भाजीपाल्याचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com