टोमॅटो, वांगी पाच रुपये; तर कोबी दोन रुपये किलो

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाल्याच्या दराला फटका बसत असल्याचे दिसत आहे.
Apmc_Nagar_1.jpg
Apmc_Nagar_1.jpg

नगर : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाल्याच्या दराला फटका बसत असल्याचे दिसत आहे. येथील बाजार समितीत भाजीपाल्याच्या ठोक दराचा विचार केला, तर टोमॅटो, वांगी, काकडीला पाच ते सात रुपये दर मिळत असून, कोबी दोन ते तीन रुपये किलो दराने विकला जात आहे. नगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. बाधित रुग्णांची संख्या पाहता गर्दीच्या ठिकाणी अधिक लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून, प्रशासन वरेचवर कठोर पावले उचल आहेत. मागील आठवड्यात आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात  आठवडी बाजारात भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे. आठवडी बाजार बंद असल्याने सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना बसत आहे. आठवडे बाजार बंद असल्याने बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढत आहेत.  सध्या नगर बाजार समितीत दररोज आठशे ते नऊशे क्विटंल आवक होत आहे, येथे दिवसात दोन वेळा भाजीपाल्याचे लिलाव होतात. उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र सध्या आवक वाढत असल्याने बाजार समितीमधील ठोक दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. सध्या टोमॅटो, वांगी, काकडीला पाच ते सात रुपये दर मिळत असून, कोबीला दोन ते तीन रुपये किलो दर मिळत आहे. शेवग्याच्या दरातही पहिल्यांदाच मोठी घट झाली आहे.  आद्रकाला दहा ते वीस रुपये, तर लसणाला प्रति किलो पाच ते सात हजार रुपयांचा दर कायम आहे. बटाट्याचे दरही सात ते दहा रुपये प्रति किलो आहेत. पालेभाज्याची या दिवसात मागणी अधिक असते. मात्र पालेभाज्याचे दरही प्रति जुडी पाच ते सात रुपये आहे. उन्हाळ्यात पहिल्यांदाच भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाल्याची आवक वाढली असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com