agriculture news in marathi, Vegetable price increase due to reduced arrivals in Pune | Agrowon

पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची दरवाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली असून, विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बटाटा, आले, भेंडी यांचा समावेश असून, पालेभाज्यांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.

पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली असून, विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बटाटा, आले, भेंडी यांचा समावेश असून, पालेभाज्यांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १४) भाजीपाल्याची सुमारे अवघी १४० ट्रक आवक झाली हाेती. यामध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून सुमारे २० टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून आले २ टेम्पो आले, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडे चार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ७०० पोती, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॉवर ८ तर काेबी सुमारे १५ टेम्पो, गवार आणि भेंडी प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, मटार १०० तर भुईमूग शेंग १५० गोणी, गाजर २५० गाेणी नवी कांदा सुमारे १० तर जुना कांदा सुमारे ८० ट्रक आणि आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १००-१४०, बटाटा : १६०-२४०, लसूण : १००-२००, आले : सातारी : ६५०-७८०, बंगलाेर ५५०-६००, भेंडी : २५०-३५० गवार : सुरती- ३००-५००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : १५०-२०० हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : १२०-१५०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १४०-१५०, पापडी : १८०-२००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ५०-१००, वांगी : १००-२०० डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : १००-१४०, वालवर : २४०-२५०, बीट : ६०-१००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २८०-३२०, भुईमूग : ३५०-४५०, पावटा : ३००-३५०, रताळी - १५०-१८०, मटार : १०००- १२००, तांबडा भोपळा : ५०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे ८० हजार तर मेथी अवघी सुमारे २५ हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :कोथिंबीर : ५००-१५००, मेथी : ७००-१४००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ७००-१२०० चाकवत : ५००-८००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-७००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-८००, पालक : ४००-८००.

फळबाजार
फळबाजारात मोसंबी सुमारे १०० टन, संत्री ४० टन, डाळिंब सुमारे २५० टन, पपई २५ टेम्पोे, लिंबे ५ हजार गोणी, चिक्कू १ हजार बाॅक्स आणि गाेणी, पेरू ७०० क्रेट, कलिंगड २० टेम्पो, खरबूज १० टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे १५० गोणी, सीताफळ सुमारे १५ टन आवक झाली हाेती.  फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-५००, मोसंबी : (३ डझन) : ९०-२५०, (४ डझन ) : ३०-१२०, संत्रा : (३ डझन) १२०-२५०, (४ डझन) : ४०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश १०-३०, आरक्ता १०-५०, कलिंगड : १०-२०, खरबुज : १०-३०, पपई  : ५-२०, चिक्कू : १००-८००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : २०-१५०, सिमला (२५ किलो) १३००-१८००, किन्नोर : (२५ ते २६ किलो) २५००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५-१६ किलो) ८००-१४००, बटरनाक : (१५ ते १६ किलो) १७००-१८००, बोरे : चेकनट (१० किलो) ५००-५५०, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो)  २००-२२०, चण्यामण्या ५००-५५०.

फूलबाजार
दसऱ्याला चांगले दर मिळतील या आशेवर शेतकऱ्यांनी झेंडू आणि शेवंतीचा फुलांचा पुरवठा राेखून धरल्यामुळे रविवारी (ता. १४) फूलबाजारात झेंडू आणि शेवंतीची आवक घटली हाेती. तर या फुलांच्या माळा आणि हारांच्या दसऱ्याला वाढणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हार, माळा करणाऱ्या घटकांची खरेदी वाढल्याने झेंडू आणि शेवंतीच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-६०, गुलछडी : ६०-१२०, बिजली : ३०-६०, कापरी : २०-६० शेवंती ६०-१२०, ऑस्टर :१०-२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २०-४०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिलिबंडल : ५-१०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१२०.

मटण मासळी
नुकत्याच आलेल्या तितली वादळाचा पश्चिम किनाऱ्याला फटका बसल्याने काही दिवस मासेमारी बंद हाेती. यामुळे बाजारात मासळीची तुलनेत उपलब्धता कमी झाल्याने दरात १० टक्‍क्यांनी वाढ झाली हाेती. गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ५  टन, खाडीची ५०० किलो, नदीची ४०० किलाे, तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ७ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ८००, लहान : ५५०-६००, भिला : ४८०-५५०, हलवा : ४००-४८० सुरमई : ४००-४८०, रावस-लहान : ४४०-४८०, मोठे ५५०, घोळ : ५००-५५०, करली : २४०, करंदी  (सोललेली) :  २४०-२८०, भिंग : २००-२८०, पाला : लहान ७००-८०० , मोठे : १२००, वाम : पिवळी ४८०-५५०, काळी : २४०-२८०, ओले बोंबील :१००-१२०,

कोळंबी ः लहान : ३२० मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : १८०, मांदेली : १०० राणीमासा : १६०-१८०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४००-४८०,

खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : १६०-२००, नगली : लहान २४०-२८० मोठी ४८०-५५०, तांबोशी : ३२०-३६० , पालू : २४०, लेपा : लहान ८०-१००, मोठे १८०-२००, शेवटे : २४० बांगडा : लहान १४०-१६० मोठा २००-२४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १००-१२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००.

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८० मरळ : लहान ३६० मोठी ४००-४८०, शिवडा : १६० चिलापी : ६० मागुर : १००, खवली : १६०, आम्ळी : ६० खेकडे : १६०, वाम : ४८०.

मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६० कलेजी : ५००.
चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२० बोनलेस : २५०.
अंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५. इंग्लिश : शेकडा : ३९२  डझन : ५४ प्रतिनग : ४.५.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...