agriculture news in marathi Vegetable prices fixed in Pune market committee | Page 2 ||| Agrowon

पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समितीमध्ये शनिवार, रविवारच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनतर सोमवारी (ता. ३) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्‍यांचे दर स्थिर होते.

पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समितीमध्ये शनिवार, रविवारच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनतर सोमवारी (ता. ३) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्‍यांचे दर स्थिर होते. मात्र फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, श्रावणी घेवडा यांची आवक तुलनेने कमी झाल्याने दरात वाढ झाली होती. 

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून सुमारे ३ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० पोती आवक झाली होती. तर कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ५ टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा ५ टेम्पो, टॉमेटो ६ हजार क्रेट, मटार ३० गोणी, तर कांदा ३० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २५ ट्रक, तर गावरान कैरी ५ टेम्पो आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : १००-१५०, बटाटा : १००-१४०, लसूण : ३००-६००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-२५०, गवार : २००-३००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १५०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : १२०-१४०, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी २००-२२०, जाड : ९०-१००, शेवगा : १००-१५०, गाजर : १००- २०० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, पावटा : ३५०-४००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : स्थानिक -८००-८५०, परराज्य -७००-८००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-१८०, तोतापुरी कैरी - १५०-२००, गावरान - १००-१५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

हापूसचे दर उतरले 

बाजार समितीत सोमवारी (ता.३) कोकणातून हापूस आंब्याची सुमारे चार हजार पेटी आवक झाली होती. तर उपलब्ध पेट्यांमध्ये सुमारे १ हजार पेटी पिकलेल्या आंब्याची होती. यावेळी ४ ते ७ डझनच्या कच्च्या पेटीला १ हजार ते ३ हजार तर तयार आंब्याच्या पेटीला १ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर होता, अशी माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि हापूसचे विक्रेते युवराज काची यांनी दिली. 
 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...