पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ

पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेल्या पुणे बाजार समितीमधील व्यवहार सोमवारी (ता. २३) सुरू करण्यात आले.
Vegetable prices increase in Pune by 25 to 30 percent
Vegetable prices increase in Pune by 25 to 30 percent

पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेल्या पुणे बाजार समितीमधील व्यवहार सोमवारी (ता. २३) सुरू करण्यात आले. या वेळी अवघ्या ४० ते ५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. सरासरी आवकेच्या केवळ ४० टक्के भाजीपाल्याची आवक झाली होती. भाजीपाल्याला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दर २५ ते ३० टक्‍क्यांपर्यंत वाढले होते,’’ अशी माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

भुजबळ म्हणाले, ‘‘रविवारच्या (ता. २२) जनता कर्फ्यूची मर्यादा सोमवारच्या (ता. २३) पहाटेपर्यंत वाढविल्याने परराज्यांसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाल्याची आवक झाली नाही. तर कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांनी देखील शेतीमाल काढला नसल्याने आवक कमीच राहिली. मात्र सलग तीन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे सर्वच शेतीमालाची विक्री होऊन दुपारी १२ वाजता बाजार समितीमध्ये शुकशुकाट झाला होता.

आवकेमध्ये कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, काकडी प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, सिमी ४-५, पारनेर येथून मटार सुमारे ५० पोती, घेवडा २ टेम्पो, इतर भाजीपाल्याची अत्यल्प आवक झाली. परराज्यांतून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची ५ टेम्पो आणि राजस्थान येथून गाजर ४ ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १८०-२२०, बटाटा : १५०-२१०  लसूण : ५००-८००, आले : ४००-५००, भेंडी : ३००-३५०, गवार : ४५०-५००, टोमॅटो : १४०-१५०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : १००-१४०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-२५०, पांढरी १२०-१५०, पापडी : १४०-१५०, पडवळ : १५०-१८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ६०-८०, वांगी : २५०-३५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ३००-४००, गाजर : १८०-२००, वालवर : १६०-१८०, बीट : ६०-८०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३००-४००, भुईमूग शेंग : ५००-७००, मटार : स्थानिक ७००-८०० तांबडा भोपळा : १४०-१५०, , सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-२०००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com