Agriculture news in Marathi, Vegetable prices remain stable in Jalgaon market | Agrowon

जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात वांगी, भेंडी, कोबी वगळता भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले. पावसाची संततधार सुरू असल्याने काढणीवर अनेक भागांत परिणाम झाला. यामुळे भाजीपाल्याची आवक स्थिर नव्हती. टोमॅटोला प्रतिक्विंटल १८०० ते २८००, चवळीला २६००, गवारीला ४५०० रुपये दर मिळाला. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात वांगी, भेंडी, कोबी वगळता भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले. पावसाची संततधार सुरू असल्याने काढणीवर अनेक भागांत परिणाम झाला. यामुळे भाजीपाल्याची आवक स्थिर नव्हती. टोमॅटोला प्रतिक्विंटल १८०० ते २८००, चवळीला २६००, गवारीला ४५०० रुपये दर मिळाला. 

वांग्यांची प्रतिदिन १६ क्विंटल आवक झाली. दर ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. आवक यावल, जळगाव, एरंडोल, जामनेर या भागांतून झाली. कोबीची आवक एरंडोल, जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यांतील सोयगाव, जालना या भागांतून झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये एवढे होते. आवक प्रतिदिन ११ क्विंटल झाली. भेंडीची प्रतिदिन १२ क्विंटल आवक झाली. दर ९०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. आवक धरणगाव, एरंडोल, जामनेर, पाचोरा, यावल, चोपडा या भागांतून झाली. तसेच, काही शेतकरी जळगाव शहरात थेट भेंडीची विक्री करण्यासाठीदेखील रोज दाखल झाले. यामुळे दर टिकून नव्हते. 

गवारीला प्रतिक्विंटल ४५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. आवक प्रतिदिन दोन क्विंटल झाली. आवक जामनेर, एरंडोल, जळगाव या भागांतून झाली. टोमॅटोची आवक जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, जालना, धुळे भागांतून झाली. मागील आठवड्यात टोमॅटोच्या दरात काहीशी घट झाली, परंतु आठवडाभर दर स्थिर होते. दर १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहीले. चवळीची प्रतिदिन तीन क्विंटल आवक झाली. दर सरासरी २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. आवक जामनेर, एरंडोल, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, यावल या भागांतून झाली. 

मेथीची प्रतिदिन साडेतीन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. आवक पाचोरा, जामनेर, भुसावळ या भागांतून झाली. मेथीची आवक मागील दोन महिन्यांपासून कमी असल्याचे सांगण्यात आले. पालकची प्रतिदिन दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० रुपयांपर्यंत राहिले. पोकळ्याची फारशी आवक नव्हती. दर प्रतिक्विंटल सरासरी १६०० रुपयांपर्यंत राहिले. लिंबूची प्रतिदिन सात क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल सरासरी २४०० रुपयापर्यंत मिळाले. लिंबूची आवक पाचोरा, एरंडोल, यावल, जामनेर या भागांतून झाली. लिंबूची आवक टिकून असल्याचे सांगण्यात आले. कोथिंबीरची प्रतिदिन तीन क्विंटल आवक झाली. आवक पाचोरा, जामनेर, धुळे, औरंगाबादमधील सोयगाव 
भागातून झाली. दर सरासरी ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...