Agriculture News in Marathi Vegetable prices rise in Pune | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक मंदावली होती.

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक मंदावली होती. आवक कमी आणि मागणी वाढल्याने बहुतांश सर्वच भाजीपाला आणि पालेभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. यामध्ये भेंडी, गवार, टोमॅटो, दोडका, हिरवी मिरची, सिमला मिरची, मटार, पावटा आदींचा समावेश आहे. 

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदूर येथून गाजर १ टेम्पो, कर्नाटकातून तोतपुरी कैरी २ टेम्पो, गुजरात येथून भुईमुगाच्या २ टेम्पो, तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० पोती आवक झाली होती. गवार, भेंडी आणि कोबी प्रत्येकी ५ टेम्पो, सिमला मिरची, तांबडा भोपळा आणि फ्लॉवर प्रत्येकी १० टेम्पो, स्थानिक मटार १५० गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर जुन्या आणि नव्या कांद्याची प्रत्येकी ३० अशी एकूण ६० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : जुना - २८०-३५०, नवीन - १५०-२५०, बटाटा : ८०-१३०, लसूण : ३००-८००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान - ६००-७००, टोमॅटो : २५०-४००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : २५०-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : ३५०-४००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ४०-८०, वांगी : ४००-५००, डिंगरी : २००-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १४०-१५०, शेवगा : ८००-८५०, गाजर : ३००- ३५० वालवर : ३५०-४००, बीट : १५०-२००, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ५००-५५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार - १४००-१६००, तांबडा भोपळा : ६०-१००, तोतापुरी कैरी -५००-५५०, सुरण :१८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे ७० हजार, तर मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक झाली होती. कोथिंबीर - १०००-१५००, मेथी -१०००-३५००, शेपू १०००-१४००, कांदापात १०००-१५००, चाकवत -१०००-१२००, करडई ८००-१०००, पुदिना २००-५००, अंबाडी - ७००-१०००, मुळे - १०००-१५००, राजगिरा - २००-५००, चुका १०००-१५००, चवळई - १०००-१२००, पालक १५००-२०००. 

फळबाजारात रविवारी (ता. १७) कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, मोसंबी सुमारे ८० टन, संत्री ५० टन, डाळिंब ३४ ते ४० टन लिंबे सुमारे दीड हजार गोणी, पेरू ८०० क्रेट आणि, चिकूची सुमारे दोन हजार बॉक्स आवक झाली होती. मागणी वाढल्याने आणि आवक तुलनेने कमी असल्याने चिकू, कलिंगड, खरबूज, पपई आणि लिंबाच्या दरात वाढ झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : २५०-४५०, मोसंबी : (३ डझन) : १४०-२८०, (४ डझन) : ६० ते १२०, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१६०, गणेश : १०-४०, आरक्ता १०-६०. कलिंगड : ८-१२, खरबूज : २२-२५, पपई : १२-२२, चिकू (१० किलो) १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-४०० 

फुलबाजारात आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर देखील संतुलित होते. 
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-८०, गुलछडी : ३०-६०, ॲस्टर (५ जुड्या) ः १०-१६, सुटा १००-१५०, कापरी : २०-५०, शेवंती : ८०- १२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जरबेरा : ५०-७०, कार्नेशियन : १८०- २२०, शेवंती काडी १५०-२५०, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३५०-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ४०-८०, जुई ४००-४५० चमेली ३००-४००.

नवरात्रोत्सवानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत मासळीची आवक होत आहे. पापलेट, सुरमईच्या दरात सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून इतर सर्व प्रकराच्या मासळीचे दर स्थिर होते. मागणीमुळे चिकनच्या दरात किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली असून, मटण आणि अंड्याचे दर स्थिर आहेत. 

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. १७) खोल समुद्रातील मासळीची १५ ते २० टन, खाडीची २०० ते ४०० किलो, तर नदीच्या मासळीची २ टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ ते २० टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठावूâर परदेशी, चिकन, अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १०००-१४०० मोठे -१२००-१४०० मध्यम : ८५००-१०००, लहान ६००-७००, भिला : ४५०-५५०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४००-५५०, रावस : लहान ४४०-५५०, मोठा : ८५० घोळ : ५५०, करली : २८०, पाला : ९००-१२००, वाम : ५५०, करंदी १४०-१६०, ओले बोंबील : १००-१६०. कोळंबी : लहान १४०-२८०, मोठी २४०-५५०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ७००-७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२८०, खेकडे : २४०-२८० चिंबोऱ्या : ४४०-४८०, मांदेली-१००-१४०, राणीमासा-२००. खाडीची मासळी : सौंदाळे-२४०-२८०, खापी-१६०-२००, नगली : ३६०-४८०, तांबोशी : ३६०-४४०, पालू- ४००, बांगडा : लहान-२००, बांगडा मोठा- २००-२४०, शेवटे २००-२४०. तिसऱ्या: २४० , खुबे : १००-१२०, लेपा-१६०-१८०, पेडवी-१००-१४०, वेळुंजी-१४०-१६०, तारली-१६०. 

नदीतील मासळी : रहू-१२०-१६०, कतला-१२०-१४०, मरळ- ४००, शिवडा-१६०-२००, खवली-२००-२४०, आम्ळी-१२०-१६०, खेकडे-२००, वाम-४८०. मटण- बोकडाचे ६६०, बोलाईचे ६६०, खिमा-६६०, कलेजी-७००. चिकन २३०, लेगपीस-२८०, जिवंत कोंबडी-१७०, बोनलेस-३२०. 

अंडी : गावरान शेकडा ९२०, डझन १२०, प्रति नगास १०. इंग्लिश अंडी- शेकडा ४६०, डझन ६०, प्रतिनग ५.००.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकूननाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटलजळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये ...