Agriculture news in marathi Vegetable prices stable in Pune | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक, मागणी, पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक, मागणी, पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर मटारच्या दरात वाढ झाली होती. 

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये उत्तर प्रदेश राजस्थानसह मध्य प्रदेशातून सुमारे १० ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानहून १० टेम्पो गाजर आणि मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, टॉमेटो ८ हजार क्रेट, स्थानिक कांदा ६० ट्रक तर गुजरात येथून पांढरा कांदा १० ट्रक आवक झाली होती. आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ४० ट्रक बटाटा आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : ३८०-४४०, बटाटा : १००-१३०, लसूण : ४००-८००, आले : सातारी १००-२००, भेंडी : ३००-३५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २००-४००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी २२०-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ६०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ३५०-४००, गाजर : १००-१४०, वालवर : २५०-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२२०, घोसावळे : १६०-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-२८०, स्थानिक -३००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

कोथिंबिरीची आवक कायम 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख तर मेथीची ८० आणि हरभऱ्याच्या २० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : २००-५००, शेपू : ६००-१०००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-५००, करडई : ५००-६००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ३००-६००, चुका : ३००-५००, चवळई : २००-३००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी - ४००-७००. 

चिंचेची आवक लांबणार 
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने चिंच झाडावरच भिजल्याने चिकट चिंचेची आवक सुरू झाली होती. मात्र चिंच झाडावरच आणखी काही दिवस वाळल्यानंतरच झोडावी आणि बाजारात आणावी, असे शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे चिंचेची तुरळक आवक होत असल्याचे व्यापारी अनिल बांडेहवालदार यांनी सांगितले. दरम्यान, अखंड चिंचेला प्रति किलोला २५ ते ३५ तर फोडलेल्या चिंचेला ७० ते १०० रुपये दर असल्याचे देखील बांडेहवालदार यांनी सांगितले. 

द्राक्षाची आवक स्थिर 
फळबाजारात लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, संत्री सुमारे ७ तर मोसंबी सुमारे २५ टन, डाळिंब २० टन, पपई १० टेम्पो, चिक्कू सुमारे २ हजार गोणी, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी सुमारे १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ५० गोणी, पेरू ४० क्रेट , स्ट्रॉबेरी १० टन आवक झाली होती. तर द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर आणि पंढरपूर भागातून २५ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : २००-४०० (४ डझन ) : १५०-२००, संत्रा : (१०  किलो) : २००-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, गणेश : २०-५०, आरक्ता ३०-१००. कलिंगड : ५-१०, खरबूज : १५-२०, पपई : ५-१२, चिक्कू (१० किलो): १००-५००, बोरे (१० किलो)- चमेली २५०-२७०, उमराण ७०-९०, चण्यामण्या १८०-६००, स्ट्रॉबेरी (२ किलो) ६०-१७०. पेरु (२० किलो) - ६००-७००. द्राक्षे - जम्बो (१०किलो) ५००-९००, सुपर सोनाका (१५ किलो) ७००-११००, माणिक चमण (१५) ५००-७००. कृष्णा (१०) ६००-९०० 

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी (ता.२१) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे ५०० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो चे भाव) : 
पापलेट : कापरी : १२०० मोठे १४००, मध्यम : ८००-९००, लहान ६००-७००, भिला : ५५०, हलवा : ४८०, सुरमई : ५५०, रावस : लहान ५५०, मोठा : ८००, घोळ : ६००, भिंग : ४००, करली : ३२०, करंदी : सोललेली ४४०, पाला : लहान ८००, मोठे : १२००, वाम : पिवळी ७००-८००, काळी ४००, ओले बोंबील :१६०- २००. 
कोळंबी : लहान २८०, मध्यम ४४०, जंबोप्रॉन्स : १२००-१४०० किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : ३२०, मांदेली : १००, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ६००. 

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी :२४०, नगली : ४००, तांबोशी : ४४०, पालू : ३२०, लेपा : लहान १६० मोठे २४०, शेवटे : २४० बांगडा : लहान १८० , मोठे २४०, पेडवी : १२०, बेळुंजी : १६०-२०० तिसऱ्या : ४००, खुबे : १२०, तारली : १६०-१८०. 

नदीची मासळी : रहू :१४०-१६० कतला : १६०-१८०, मरळ : ४८०, शिवडा : २८०, खवली : ३००, आम्ळी : १४०, खेकडे : २००, वाम : ५५० 

चिकन : चिकन : १६०, लेगपीस : २०० जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०. 

अंडी : गावरान : शेकडा : ८४० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४५० डझन : ६० प्रतिनग : ५ 

मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ७००. 

फुलांचे दर स्थिर 

फूल बाजारात विविध फुलांची आवक साधारण होती. राज्यातील काही भागात नुकत्याच झालेल्या झालेल्या पावसामुळे फुलांचे नुकसान झाले होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने गुलाबाचे वगळता इतर सर्व फुलांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१५०, अ‍ॅष्टर : जुडी ८-१२, सुट्टा ४०-८०, कापरी : १०-३०, शेवंती : ५०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-२५, गुलछडी काडी : २०-७०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ८०-१२०, लिलियम (१० काड्या) : ८००-१२००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ३०-७०.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...