Agriculture News in Marathi Vegetable prices stable in Pune | Agrowon

पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १४) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक आणि मागणी वाढल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. मात्र काकडी, शेवगा, मटार आणि पावट्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.
 

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १४) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक आणि मागणी वाढल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. मात्र काकडी, शेवगा, मटार आणि पावट्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.

आवके मध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश येथून अवघा १ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ३ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून २ टेम्पो तोतापुरी कैरी, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसनाची सुमारे ८ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो सुमारे ८ हजार क्रेटस, हिरवी मिरची ४ टेम्पो, फ्लॉवर कोबी आणि सिमला मिरची प्रत्येकी १० टेम्पो, गाजर ३ टेम्पो, स्थानिक मटार सुमारे ५० गोणी, भुईमूग शेंग ४० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा ७० ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ८० ट्रक इतकी आवक झाली होती. 

फळभाज्यांचे १० किलोचे भाव 
कांदा : नवीन १५०-२५०, जुना २००-२८०, बटाटा : १३०-२००, लसून : ३५०-७००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : ३००-४००, गवार :४००-६००, टोमॅटो : २५०-३००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००- २५०, काकडी : २५०-३००, कारली हिरवी २५०-३००, पांढरी २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : १००-१५०, वांगी : २५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-४००, तोंडली : कळी ३००-४००, जाड, १५०-१८०, शेवगा : १२००, गाजर २५०-५००, वालवर ३५०-४००, बीट : १५०-२००, घेवडा : ४५०-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २५०-३००, भुईमुग शेग : ४००-४५०, मटार : स्थानिक: १६००-१७००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, तोतापुरी कैरी : ४००-५००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ : शेकडा १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची ८० हजार, तर मेथीची १ लाख जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१७००, मेथी : ५००-१०००, शेपू : ८००-१३००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५००-८००, करडई : ६००-१०००, पुदीना २००-४००, अंबाडी ३००-६००, मुळे : ७००-१२००, राजगिरा : ३००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-५००, पालक : १०००-१३००. 

फळबाजारात रविवारी (ता.१४) लिंबाची सुमारे तीन हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ३० टन, मोसंबी ५० टन, संत्रा ३० टन, पपई ८ टेम्पो, चिकू १ हजार गोणी, पेरूची सुमारे ७०० क्रेट, सीताफळ ३ टन, कलिंगड ३ तर खरबूज २ टेम्पो, अंजीर दीड टन, आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : १००-२५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२८०, (४ डझन) : ४० -१००, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : १०-४०, आरक्ता १०-६०. कलिंगड : १८-२२ खरबूज : २०-३० पपई : १२-१६, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): ३००-३००, सीताफळ ३०-१००. 

फूलबाजार 
लग्नसराईमुळे फुलबाजारात डच गुलाब, जर्बेरा, कार्निशियन आदी शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे. शहर व राज्याच्या तुलनेत परराज्यातील खरेदीदारांकडून या फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारपासून (ता.१५) तुळशी विवाहास सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर झेंडू, शेवंती, अ‍ॅष्टर आदी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व फुलांची आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर टिकून होते. 

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी १०-१५, सुट्टा ४०-६०, कापरी : १०-३०, शेवंती : १५- ५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२५, गुलछडी काडी : ४०-१५०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जरबेरा : ८०-१२०, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) : १२००-१५००, ऑर्चिड : ३५०-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-१२०, जुई : ८००-९००, चमेली : ६००-८००. 

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १४) खोल समुद्रातील मासळीची सुमारे २५ टन, खाडीतील मासळीची ४०० किलो, नदीतील मासळी एक टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे २५ टन मासळीची आवक झाली होती. दिवाळीनंतर थंडीचा हंगाम सुरू झाल्यानमुळे मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. पापलेट, कोळंबी, सुरमई हलवा, रावस, बांगडा या मासळीला मागणी चांगली असून, दर स्थिर आहेत, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तसेच मटण आणि चिकनला मागणी असल्याचे विक्रेते प्रभाकर कांबळे, रुपेश परदेशी यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : ११००-१४०० मोठे -१०००-१२०० मध्यम : ८००-९००, लहान ६००-७००, भिला : ५००-५५०, हलवा : ४४०-५५०, सुरमई : ३८०-५५०, रावस : लहान ४८०-५५०, मोठा : ६५०-७५०, घोळ : ५००-६५०, करली : २००-२८०, पाला : ५५०-१२००, वाम : ६००, करंदी-४००-४५०, ओले बोंबील : १२०-१८०, भिंग-३६० 
कोळंबी : लहान २००-२८०, मोठी-४४०-५५०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ६५०- ७५०, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २००-२८०, खेकडे : २४०-३२० चिंबोºया : ४४०-४८०, मांदेली-१२०-१४०, राणीमासा-१६०-२०० 

खाडीची मासळी : सौंदाळे-२००-२४०, खापी-२००-२४०, नगली : १८०-२४०, तांबोशी : ३६०-४००, पालू- २४०, बांगडा : लहान-१६०-२००, बांगडा मोठा- २००-२४० शेवटे २००-२४०. तिसºया: २००-२४० , खुबे : १००-१२०, लेपा-१६०-२००, पेडवी-१००, वेळुंजी-१४०-१६०, तारली-१८०-२०० 

नदीतील मासळी 
रहू-१२०-१३०, कतला-१३०-१४०, मरळ-४००, शिवडा-१८०-२००, खवली-१८०-२००, आम्ळी-८०-१००, खेकडे-२००-२४०, वाम-४८० 

मटण- बोकडाचे ६८० , बोलाईचे- ६८० , खिमा-६८० , कलेजी-७२० 
चिकन २२० , लेगपीस-२७० , जिवंत कोंबडी-१६० , बोनलेस-३२० 

अंडी 
गावरान शेकडा ९२०, डझन १२०, प्रतिनगास १० 
इंग्लिश शेकडा ४४५ डझन ६०, प्रतिनगास ५ 


इतर बाजारभाव बातम्या
गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर  नगर ः नगर येथील दादा पाटील...
काकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...
Top 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
Top 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...
जालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर  : नगर येथील दादा पाटील...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...
रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...
पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
लातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...
कापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...