नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
अकोल्यात शनिवार, रविवारी भाजीपाला विक्री बंद
जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अकोला ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात प्रशासनाकडून वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जात आहेत. आता जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन असून, या काळात भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत.
गेल्या महिन्यात अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला. यानंतर प्रशासनाने वेळोवेळी धोरणात बदल घडविले. आजवर केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्व संबंधित व्यावसायिक, दुकानदार तसेच कामगार यांनी त्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्रतिष्ठान, दुकान, व्यवसाय येथील सर्व संबंधितांची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली असेल, अशाच प्रतिष्ठान, दुकान, व्यावसायिकांना त्यांची आस्थापने सुरू ठेवता येईल. अन्यथा, अशी प्रतिष्ठाने सील करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्याचा इशारा देण्यात आला.
भाजीपाला विक्रेत्यांवर गंडांतर
शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात भाजीमंडी, भाजीपाला, फळांची विक्री करणारे बाजार, तसेच किरकोळ भाजीपाला व फळांची विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदीचे पालन न करण्याऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
हे राहील सुरू
खाद्यगृहे, रेस्टॉरेन्ट, दूध विक्री, दुधाचे घरपोच वितरण, सर्व खासगी व वैद्यकीय सेवा, सर्व खासगी व शासकीय रुग्णालये, पशुचिकित्सक सेवा व रुग्णालये, सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडित सेवा, औषधींची दुकाने, सर्व पेट्रोल पंप, उद्योगधंदे, सर्व प्रकारची शासकीय कार्यालये आणि बॅंका, मालवाहतूक, पहाटे तीन ते सकाळी सहापर्यंत ठोक भाजी बाजार.
हे राहील बंद
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे, शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन बंद राहतील.