राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली 

बाजार अनिश्‍चिततेचा फटका नाशिक भागालाही बसला. त्यातच औषधांच्या किंमती स्थानिक विक्रेते, डिलर पातळीवर वाढविण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांत नैराश्‍य आहे. नाशिक, मुंबईच्या बाजारपेठा थंड आहेत. या बाजारसमिततही कोरोना प्रादुर्भाव झाल्याने बाजारपेठात जाण्यास शेतकरी उत्सुक नाही. यामुळे या काळात गजबजलेला भाजीपाला पट्टा शांतच आहे. याचे परिणामी पुढील दोन महिन्यात दिसू शकतील. - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (नाशिक)
vegetable
vegetable

कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे कोसळलेले दर, भाजीपाला रोपांची अनुपलब्धता आदिसह अन्य कारणांमुळे राज्यात नव्याने होणारी भाजीपाला लागवड खोळंबली आहे. बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. महत्वाच्या शहरांतील लॉकडाउन कायम आहे. परिणामी भाजीपाल्याची मागणी अजूनही वाढलेली नाही. याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. कोल्हापूर, नाशिक भागासह राज्यंतील भाजीपाला पट्यातही अशीच परिस्थिती आहे.  महत्वाच्या बाजारपेठा एक तर बंद किंवा कमी क्षमतेने सुरु असल्याने मालाचा उठाव होईनासा झाला आहे. यामुळे या बाजारपेठांत दररोज शेकडो वाहने पाठविणाऱ्या गावांमध्येही गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे शांतता आहे. बाजारपेठा कधी बंद कधी सुरु या खेळात भाजीपाला उत्पादक संघांची दैना उडत आहे. याचा सरसकट परिणाम स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या नियोजनावर होत असल्याचे विदारक चित्र भाजीपाला पट्यात कायम आहे. सगळ्याच गोष्टी नकारात्मक घडत असल्याने भाजीपाला पट्यात नव्या लागवडी खोळंबल्या आहेत. 

दोन महिन्यापासून रोपांची विक्री थंडावली  पश्‍चिम महाराष्ट्रातून राज्यभर भाजीपाला लागवडीसाठी रोपे जातात. पण कोरोनासंकटामुळे भाजीपाल्याची रोपे तयार करणे अडचणीचे बनले आहे. रोपे तयार करण्यासाठी कच्चा माल वेळेत उपलब्ध होत नसल्याने रोपवाटिका चालकांनाही शेतकऱ्यांना आवश्‍यक त्या प्रमाणात रोपे तयार करणे कठीण होवून बसले आहे. एखाद दुसऱ्या भाज्यांची रोपेच रोपवाटिकेत तयार होत आहेत. अर्धवट स्थितीतील लॉकडाउनमुळे कच्चा माल पाठवून देण्यास बाहेरील व्यापारी कचवचत आहेत. एकूण उपलब्ध होणारी वहाने, मनुष्यबळ या कचाट्यात रोपवाटिका अडकल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून रोपवाटिकांची स्थिती सुधारली नाही. याचा सगळा परिणाम रोपे तयार करण्यावर झाला आहे. 

खते औषधे मिळवताना अडचणी  भविष्यात दर मिळेल या अपेक्षेने गेल्या महिन्याभरात काही शेतकऱ्यांनी पुन्हा भाजीपाला लागवड केली. परंतू ज्या प्रमाणात औषधे, खते मिळायला हवीत तितक्‍या प्रमाणात व तितक्‍या वेळेत उपलब्धता होत नसल्याचे भाजीपाल्याचे व्यवस्थापन करणे अशक्‍य बनत असल्याने अनेकांनी तयार केलले प्लॉट तसेच ठेवून दिले आहेत. आवश्‍यक ती रोपे, खते, बियाणाची उपलब्धता करण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे असल्याचे भाजीपाला उत्पादक पट्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी औषधांच्या किंमतीमध्येही कृत्रिम वाढ करण्यात आली आहे. याचा फटकाही शेतकऱ्याला बसू लागला आहे.  प्रतिक्रिया जूनमध्ये भाजीपाल्याला मागणी वाढेल या विचाराने सुरु असलेला भाजीपाला प्लॉट काढून नव्याने भाजीपाल्याची लागवड सुरु केली होती. परंतू बाजारपेठांमध्ये अनिश्‍चितता व व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरु लागले. शेत तयार असूनही मी भाजीपाल्याची नवी लागवडही थांबविली आहे.  - सागर संभूशेटे, नांदणी, जि. कोल्हापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com