Agriculture news in Marathi vegetable vendors distribute masks and hand gloves | Agrowon

वाशीम येथे भाजीपाला विक्रेत्यांना मास्क, हॅंडग्लोजचे वाटप 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

वाशीम ः जिल्हा कृषी विभाग, आरसीएफ आणि इफ्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शेतकरी फळे भाजीपाला विक्रेत्यांना मास्क व हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि राष्ट्रीय केमिकल अॅन्ड फर्टिलायझर्स आणि इफ्को कंपनीने जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवला. 

वाशीम ः जिल्हा कृषी विभाग, आरसीएफ आणि इफ्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शेतकरी फळे भाजीपाला विक्रेत्यांना मास्क व हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि राष्ट्रीय केमिकल अॅन्ड फर्टिलायझर्स आणि इफ्को कंपनीने जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवला. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत शेतकरी, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यामध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकूल मैदान, वत्सगुल्म मराठी शाळा, आयूडीपी कॉलनी, कृषी उत्पन्न बाजार समिती, गुरुवार बाजार येथे फळ, भाजीपाला, विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

या विक्रेत्यांना ‘कोरोना’ विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी सुरक्षितता व जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता मास्क व हँडग्लोजचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. तोटावार, कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे जिल्हा सचिव सुनील पाटील, संघटनेचे पदाधिकारी, कृषी विभागातील तंत्र अधिकारी श्री. मकासरे, मंडळ अधिकारी दिलीप कंकाळ, कृषी सहायक दीपक आरु, डॉ. हुसेन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय दुधे, गजानन भोयर यांनी सदर कीट वाटप केले. गुरुवार बाजार येथील मंडीमध्ये नगराध्यक्ष अशोक हेडा यांनीही जनजागृती केली. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...