परभणीत व्यापाऱ्यांमुळे भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांचा तोटा

परभणी : लॉकडाऊनमुळे येथील पाथरी रस्त्यावरील भाजीपाला फळे मार्केटमधील आवक वाढली. त्यामुळे दरात घसरण झाली. या ठिकाणी घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी या मार्केट पुढील जागेत बस्तान मांडले आहे.
Vegetable vendors lose farmers due to traders in Parbhani
Vegetable vendors lose farmers due to traders in Parbhani

परभणी : लॉकडाऊनमुळे येथील पाथरी रस्त्यावरील भाजीपाला फळे मार्केटमधील आवक वाढली. त्यामुळे दरात घसरण झाली. या ठिकाणी घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी या मार्केट पुढील जागेत बस्तान मांडले आहे. ते शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजी-पाल्याची खरेदी करुन परिसरातील नागरिकांना दुप्पट- चौपट दराने विक्री करत आहेत. या प्रकारामुळे भाजीपाला उत्पादकांना तोटा होत आहे. मध्यस्थ शेतकऱ्यांच्या मालावर डल्ला मारुन मालामाल होत आहेत. 

तालुका प्रशासन, महापालिका प्रशासन, कृषी विभागातर्फे वसमत रस्त्यावरील भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ओळपत्रे देण्यात आली. ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखून विक्री करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकरी त्यानूसार बसून भाजीपाल्याची विक्री करु लागले. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येताच अनेक किरकोळ व्यापारी दोन शेतकऱ्यांच्या मधील मोकळ्या जागेत भाजीपाला विक्रीसाठी बसू लागले. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला. अखेर वसमत रस्त्यावरील भाजीपाला बाजार उठवावा लागला. केवळ व्यापाऱ्यांनी गर्दी केल्यामुळे दररोज ताजा भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

‘आत्मा’अंतर्गत स्थापित शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांतर्फे विविध वसाहतीमध्ये वाहनाव्दारे ताजा भाजीपाला आणून विक्री केली जात आहे. शेतकऱ्ंयाप्रमाणे अनेक व्यापारी देखील वाहनाव्दारे भाजीपाल्याची विक्री करत आहेत. त्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये एकूण ९० घाऊक व्यापारी आहेत. या ठिकाणी घाऊक विक्रीचे व्यवहार अपेक्षित आहेत. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाला, फळांची खरेदी करुन दुप्पट, चौपट दराने किरकोळ विक्री केली जात आहे. 

नागरिक भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखले जात नाही. भाजीपाला विक्रीसाठी आलेले अनेक शेतकरी ठोक विक्री करुन गावाकडे परतात. परंतु, मध्यस्थ व्यापारी मात्र ग्राहकांना अधिक दराने विक्री करुन काही तासांच अमाप नफा कमावत असल्याचे चित्र आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com