Agriculture news in marathi Vegetables and fruits for sale in Parbhani Farmers allowed in 25 places | Agrowon

परभणीत भाजीपाला, फळे विक्रीसाठी शेतकऱ्यांना २५ ठिकाणी परवानगी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

परभणी : लॉकडाउनच्या काळात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेतर्फे भाजीपाला, फळे विक्रेत्यांना शहरातील २० ते २५ ठिकाणी खुल्या मैदानावर जागा दिली आहे. प्रत्येक विक्रेत्यास १५ ते २० फुट जागा मार्किंग करुन दिल्या आहेत.

परभणी : लॉकडाउनच्या काळात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेतर्फे भाजीपाला, फळे विक्रेत्यांना शहरातील २० ते २५ ठिकाणी खुल्या मैदानावर जागा दिली आहे. प्रत्येक विक्रेत्यास १५ ते २० फुट जागा मार्किंग करुन दिल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५१० शेतकरी- विक्रेत्यांची भाजीपाला, फळे विक्रीची सोय झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांतर्गंत महानगरपालिकेचे आयुक्‍त रमेश पवार यांच्‍या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्‍त आणि स्‍वच्‍छता निरीक्षकांनी शेतकऱ्यांना, अन्य विक्रेत्यांना भाजीपाला, फळे विक्रीसाठी शहरात जागा दिल्‍या आहेत. त्‍याच ठिकाणी भाजीपाला- फळे विक्री करण्‍याच्‍या सूचना दिल्या आहेत. 

शहरातील गणपती चौक, पारदेश्‍वर मंदीर, विद्यानगर, शालीमार फंक्‍शन हॉलजवळ, जामनाका, जुना मोंढा, सिटी पोलीस चौकीजवळ, गांधीपार्क, आर. आर. टॉवर, क्रांती चौक, गंगाखेड नाका, गव्‍हाणे चौक, उघडा महादेव मंदिराच्‍या बाजूस, लोकमान्‍य नगर, येलदरकर कॉलनी, कल्‍याण नगर, राजेंद्र गिरी नगर,कृष्‍णा गार्डनच्या बाजूची मोकळी जाग, जागृती कॉलनी, शिवाजी नगर आदी ठिकाणे त्यात आहेत. जवळपास ५१० पेक्षा जास्त विक्रेत्‍यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. त्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी कर्मचाऱ्यांचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. 

भाजीपाला-फळे विक्रेत्यांनी तोंडाला मास्‍क व रुमाल बांधूनच विक्री करावी, अशा सूचना दिल्‍या आहेत. नागरिकांनी अत्‍यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. वैयक्तिक अंतर ठेवावे. मास्‍कचा वापर करावा. फळे, भाजीपाला घरी गेल्‍यानंतर मिठाच्‍या पाण्‍याने स्‍वच्‍छ धुऊन घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...