पुण्यात भाजीपाल्याची आवक मंदावली; दरात वाढ

डबल बीची झालेली आवक
डबल बीची झालेली आवक

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्यात राज्यात पडलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे विविध भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवकदेखील तुलनेने मंदावली हाेती. परिणामी बहुतांश भाजीपाल्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली हाेती.  परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये मध्य प्रदेशातून सुमारे २० ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे २ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ३ हजार गोणी आवक झाली हाेती. तर स्थानिक आवकेत सातारी आले सुमारे १ हजार ५०० गाेणी, टॉमेटोची सुमारे ५ हजार क्रेट, हिरवी मिरची सुमारे ५ टेम्पो, फ्लॉवर १० तर काेबी सुमारे १५ टेम्पाे, ढोबळी मिरची सुमारे १० टेम्पो, पावटा ८ टेम्पो, वांगी ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, गवार ५ टेम्पो, भेंडीची ६ टेम्पो, तर नवीन कांद्याची सुमारे १५० ट्रक तर जुन्या काद्यांची अवघी ३ ट्रक आवक झाली हाेती. तर आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून बटाट्याची सुमारे ७५ ट्रक आवक झाली. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : नवीन २५०-३२० जुना ३५०-४५०, बटाटा : ४०-८०, लसूण : १५०-३५०, आले सातारी : १८०-२२०, बंगलाेर २५०-२६०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १२०-१८०, चवळी : १५०-२००, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२२०, पापडी : १४०-१६०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : १२०-१४०, कोबी : ८०-१३०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१२०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-३२०, जाड : १३०-१४०, शेवगा : ६००-६५०, गाजर : १६०-१८०, वालवर : १६०-२००, बीट : १००-१२०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : १४०-१६०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १३०-१४०, ढेमसे : २००-२२०, मटार : २४०-२६०, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ८०-१४०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची ७० हजार जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर :  ३००-६००, मेथी : ३००-५००, शेपू : ३००-५००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ६००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-५००, चुका :  ७००-८००, चवळई : ५००-६००, पालक :  ३००-५००, हरभरा -  ५००-७००. फळबाजार रविवारी (ता.२४) फळबाजारात मोसंबी सुमारे ४० टन, संत्री ६०० पेटी, डाळिंब सुमारे ६० टन, पपई सुमारे १५ टेम्पोे, लिंबे सुमारे ७ हजार गोणी, चिक्कू १ हजार गाेणी, पेरु ६०० क्रेट,  कलिंगड सुमारे २५ टेम्पो, खरबुज ८  टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे साडे तीन हजार गोणी, द्राक्षे ७ टन, स्ट्रॉबेरीची सुमारे ५ टन आवक झाली हाेती.  फळांचे दर पुढीलप्रमाणे  लिंबे (प्रति गोणी) : ८०-१३०, मोसंबी : (३ डझन) : ९०-३५०, (४ डझन ) : ३०-२४०, संत्रा : (८ ते १० डझन) १०००-११०० (११ ते १५ डझन) : ९००-११०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-९०, गणेश १०-२५, आरक्ता ५-४०. कलिंगड : ३-१०, खरबुज : १०-३०, पपई  : ५-२०, चिक्कू :१००-५००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सफरचंद : सिमला (२० ते २५ किलो) : १५००-२०००, काश्मीर डेलीशियस (१५ किलो) ७००-१३००, किन्नोर : ( २५ किलो) २०००-२५००, अमेरिकन डेलीशियस : (१५ किलो) १०००-१३००, महाराजा ( १५ किलो) : ५००-७००. बोरे : चेकनट (१० किलो) २२०-२४०, चण्यामण्या : ३५०, चमेली : ६०-७०, उमराण : ३०-४०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ७००-११०, सुपर सोनाका (१५ किलो) : १०००-१५००, जम्बो (१० किलो) : ५००-१०००, शरद (१५ किलो) : ७००-११००, स्ट्रॉबेरी (२ किलाे पनेट )२५०-३००. मटण मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २४) खोल समुद्रातील सुमारे १४ टन, खाडीची ६०० किलाे, आणि नदीतील सुमारे ५०० किलो, तर आंध्रप्रदेशातून धरणातील रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १२ आवक झाली आहे. नाताळ सण आणि थंडीमुळे विविध मासळींच्या मागणी आणि दरात वाढ झाली असून, गावरान अंड्यांच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे.  भाव (प्रतिकिलो)  पापलेट कापरी ः १५००, मोठे ः १४००, मध्यम ः ८००, लहान ः ६००, भिला ः ५००, हलवा ः ४८०, सुरमई ः ४८०, रावस लहान ः ६२०, मोठा ः ६५०, घोळ ः ५५०, करली ः २८०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः ३२०, पाला : ६००-१४००, वाम ः पिवळी ४८०-६००, काळी : ४००, ओले बोंबील ः १४० कोळंबी लहान : ३६०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : १६००, किंगप्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १६००, मोरी : १६०- २४०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : १७०-२८०, चिंबोऱ्या : ४८०-८००. खाडीची मासळी सौंदाळे ः २४०, खापी ः २००, नगली ः २८०-४८०, तांबोशी ः ३६०, पालू ः २४०, लेपा ः १४०-२००, शेवटे : १६०-२८०, बांगडा : १२०-१८०, पेडवी ः ५०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १०० नदीची मासळी रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १४०, चिलापी : ५०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६०-२००, वाम ः ४८०. मटण  बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८० चिकन चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६० अंडी गावरान शेकडा : ७८०, डझन : १६०, प्रति नग : ९. इंग्लिश शेकडा : ३७०, डझन : ६०, प्रतिनग : ५ फूलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ३०-६०, बिजली : १०-३०, कापरी : १०-३०, शेवंती : ४०-७०, ऑस्टर : ३-६, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१५, ग्लॅडिएटर : ५-१५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०, लिलिबंडल : ३-५ अबोली लड : १५०-२५०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-१५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com