agriculture news in marathi vegetables, onion and potato trading starts in mumbai APMC | Agrowon

मुंबईत भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार पूर्ववत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कोरोनाच्या धास्तीमुळे बंद राहिलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आणि कांदा बटाटा बाजार बुधवारपासून (ता.१५) पुन्हा सुरू झाले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या धास्तीमुळे बंद राहिलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आणि कांदा बटाटा बाजार बुधवारपासून (ता.१५) पुन्हा सुरू झाले आहेत. काल बाजार आवारात सुमारे सहाशे वाहने भाजीपाला आणि कांदा बटाटा आला आहे. तर सुमारे चारशे वाहने थेट मुंबईत गेल्याचे बाजार समितीचे प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले. 

सकाळ-ॲग्रोवन मुंबई-पुणे सारख्या बाजार समित्या बंद असल्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा विषय सातत्याने मांडल्यानंतर अखेर बुधवारपासून मुंबई बाजार समितीत व्यवहार सुरू झाले. दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून बाजार आवारात सामाजिक अंतर राखले जावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. 

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा-बटाटा आणि भाजीपाला बाजार कालपासून पुन्हा सुरू केले आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी बाजार समितीत भाजीपाला आणि कांदा बटाटा या शेतमालाची सुमारे सहाशे वाहने आली आहेत. तर विविध चेक नाक्यावरुन सुमारे चारशे वाहने मुंबई शहरात थेटपणे पाठवण्यात आली आहेत. यात ट्रक आणि टेम्पो अशा वाहनांचा समावेश आहे. 

तसेच बाजार आवारात सामाजिक अंतर राखले जावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. बाजार समिती सुमारे आठशे एकरवर पसरली आहे, त्यामुळे पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

फळबाजार बंदच
बाजार समितीत अजूनही फळं बाजार, अन्नधान्य व मसाला बाजार बंदच आहेत. हे बाजार आवार लवकर सुरू करण्यासाठी समिती प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...