पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २० टक्के वाढ

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २४) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ७० ट्रकांची आवक झाली. गेल्या पंधरवड्यात झालेल्या तौक्ते वादळामुळे आवकेत घट झाल होती. परिणामी, भाजीपाल्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
Vegetables rates increase in 10 to 20 percent  in Pune
Vegetables rates increase in 10 to 20 percent in Pune

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २४) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ७० ट्रकांची आवक झाली. गेल्या पंधरवड्यात झालेल्या तौक्ते वादळामुळे आवकेत घट झाल होती. परिणामी, भाजीपाल्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. 

आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची ७ ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे सातशे पोती आवक झाली. तर कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर  ५ आणि सिमला मिरची ७ टेम्पो, भेंडी ५ तर गवार ५ टेम्पो, टॉमेटो ५ हजार क्रेट, गाजर २ टेम्पो, घेवडा २ टेम्पो, भुईमुग शेंगा ५० गोणी, तांबडा भोपळा ७ टेम्पो, गावरान कैरी ५ टेम्पो, तर कांद्याची ५० ट्रक आवक झाली. तर बटाट्याची आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : १००-१६०, बटाटा : १००-१६०, लसूण : ४००-७००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-२५०, गवार : ३००-३५०, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-१४०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी १८०-२००, पापडी : ३५०-४००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ७०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी २००-२२०, जाड : ९०-१००, शेवगा : १५०-२००, गाजर : १००- २०० वालवर : ४००-४५०, बीट : ८०-१००, घेवडा : ७००-८००, कोहळा : १४०-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : ४००-४५०, भुईमूग शेंग : ४००-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, तोतापुरी कैरी - १५०-२००, गावरान - २००-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com