agriculture news in marathi Verification of cotton from registered farmers in Jalna district started | Agrowon

जालना जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील कापसाची पडताळणी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

जालना : जिल्ह्यातील विविध बाजार समितींकडे कापसाच्या खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडे नेमका उपलब्ध कापूस किती याची पडताळणी यंत्रणेकडून केली जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मे रोजी निर्गमित केले आहेत. 

जालना : जिल्ह्यातील विविध बाजार समितींकडे कापसाच्या खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडे नेमका उपलब्ध कापूस किती याची पडताळणी यंत्रणेकडून केली जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मे रोजी निर्गमित केले आहेत. 

पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे वेळ कमी असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे नेमका कापूस किती शिल्लक आहे, याची खरेदीच्या नियोजनाच्या दृष्टीने पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १७ ते ३० एप्रिल दरम्यान बाजार समित्यांकडे ४० हजार ५७७ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे ११ लाख १ हजार ५३७ क्विंटल कापूस विक्री विना शिल्लक असल्याची नोंद केली होती. त्यांपैकी २८०० शेतकऱ्यांकडील ७८ हजार ६७९ क्विंटल ६७ किलो कापसाची २३ मे अखेरपर्यंत खरेदी करण्यात आली. 

बाजारातील कापसाचे मूल्य व शासनाचे हमी दर यामध्ये तफावत आहे. शिवाय हमी दर बाजार मूल्यापेक्षा जास्त असल्याने व्यापारी केंद्रावर कापसाची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक आहे. त्यामुळे तालुकानिहाय किती कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे, याबाबत शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पडताळणी करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व गटसचिवांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. 

बाजार समित्यांनी नोंदणीकृतपैकी कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळून उर्वरितांची यादी पडताळणी करणाऱ्या यंत्रणेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत द्यावी. त्यानंतर तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी ३१ मे पर्यंत दररोज प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उपलब्ध कापसाची विहित नमुन्यात इतंभूत माहिती नोंदवून उपलब्ध कापसासह शेतकऱ्याची छायाचित्रही घ्यावयाचे आहे.

या विषयी दैनंदिन अहवाल संबंधित कर्मचाऱ्यांनी तहसिलदार व सहाय्यक निबंधकांद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दररोज सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती जालनाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...