हरभरा अनुदानासाठी सातबाऱ्यावरील नोंदीची पडताळणी

हरभरा अनुदानासाठी सातबाऱ्यावरील नोंदीची पडताळणी
हरभरा अनुदानासाठी सातबाऱ्यावरील नोंदीची पडताळणी

जळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी करूनही विक्रीपासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील हरभरा पिकाच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे.

ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशन मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे १७०० शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची विक्री निर्देशीत मुदतीत शासकीय हरभरा खरेदी केंद्रात झाली नव्हती. या शेतकऱ्यांना कमाल दोन हेक्‍टर मर्यादेपर्यंत क्विंटलमागे एक हजार रुपये अनुदान देण्याचे निर्देश शासनाने नुकतेच दिले आहेत.

या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती तहसील कार्यालयांमध्ये पाठविली आहे. या कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा उतारे पडताळले जात आहेत. त्यावर हरभरा पिकाची नोंद कुठल्या वर्षी आहे, हे लक्षात घेतले जात आहे. ही माहिती पाठविण्यास आणखी २० दिवस कालावधी लागू शकतो, असे सांगितले जात आहे.

तहसील कार्यालयालयांतील एका कर्मचाऱ्यावर ही माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर इतर कामांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे माहिती गोळा करून तशा नोंदी, अभिप्राय द्यायला विलंब लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. हरभऱ्याचे चुकारे प्रलंबित शासकीय केंद्रात हरभरा विक्री केलेल्या अनेक हरभरा उत्पादकांना शेतकी संघांकडून चुकारे मिळालेले नाहीत. तेथील कर्मचाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती भरताना बॅंक खाते क्रमांक चुकविले आहेत. त्याच्या दुरुस्त्यांना वेळ लागत असून, लवकरच संबंधित शेतकऱ्यांना चुकारे दिले जातील. वरिष्ठ कार्यालयाकडून चुकाऱ्यांबाबत अडचण नसल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com