`‘कर्जमुक्ती’साठी आधार प्रमाणिकरण करा`

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत ११ हजार ६२४ शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया बाकी आहे.
Verify Aadhaar for ‘Debt Relief’
Verify Aadhaar for ‘Debt Relief’

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत ११ हजार ६२४ शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया बाकी आहे. आजवर १ लाख ४४ हजार ९०७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार २४ कोटी २० लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित केली आहे. कर्जमाफीची रक्कम जमा होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात सोमवार (ता.२४) पर्यंत १ लाख ८४ हजार ८४२ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. त्यापैकी १ लाख ७३ हजार २१८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकर करुन घेतले. २ लाख १४ हजार ४९१ कर्जखात्यांचा समावेश  आहे. शेतकऱ्यांना १ हजार ४६१ कोटी ३६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल.

आजवर २ लाख १२ हजार ७५९ कर्जखाती (९९.१९ टक्के) आधार संलग्न करण्यात आली. त्यापैकी बॅंकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर १ लाख ९७ हजार १४१ कर्जखाती (९२.६६ टक्के) अपलोड केली. पोर्टलवर १ लाख ८४ हजार ८४२ कर्जखात्यांची यादी प्रसिध्द केली. त्यापैकी १ लाख ७३ हजार २१८ शेतकऱ्यांनी (९३.७१) आधार प्रमाणिकरण करुन घेतले आहे. 

विविध बॅंकांच्या १ लाख ४४ हजार ९०७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १ हजार २४ कोटी २० लाख एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी  लाभार्थ्यांनी तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले.

कर्जमुक्ती योजना स्थिती 

एकूण कर्जखाती  २१४४९१
एकूण रक्कम १४६१.३६ कोटी रुपये
आधारक्रमांक संलग्न खाती  २१२७५९
पोर्टलवर अपलोड खाती  १९७१४१
पोर्टलवर प्रसिध्द कर्जखाती १८४८४२
आधार प्रमाणिकरण खाती १७३२१८
रक्कम हस्तांतरित खाती  १४४९०७
हस्तांतरित रक्कम १०२४.२० कोटी रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com