उभी पिके वन्यप्राण्यांकडून फस्त; शेतकरी त्रस्त

Vertical crops consumed by wildlife
Vertical crops consumed by wildlife

ढेबेवाडी, जि. सातारा : पीक काढणी सुरू असतानाच उभ्या पिकांचे वन्यप्राणी नुकसान करीत असल्याने निवी, कसणीसह परिसरातील अनेक गावांतील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतात उभी असलेली नाचणी, भुईमूग, भात व कडधान्य पिके गवे आणि रानडुकरांच्या कळपांनी काढणीच्या आदल्या रात्रीच फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.

ढेबेवाडी विभागातील जंगलाच्या कुशीत वसलेल्या निवी, कसणी, निगडे, घोटील आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांना वन्यप्राण्यांचा सतत उपद्रव जाणवतो. पीक लागवडीखालील क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम झाला असून, नुकसानीपेक्षा शेती पडीक ठेवलेली बरी अशी भावना येथील शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याने पडीक क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. 

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील ही गावे चोहोबाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेली असून, बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला ही तर तेथे नित्याचीच बाब झाली आहे. सध्या या भागात भात, भुईमूग आणि नाचणीची काढणी सुरू असून, दिवसभर पीक काढणी, रात्री शिवारात शिल्लक पिकाची राखणी आणि पहाटे मळणी असा दिनक्रम शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी राखणीस गेल्यावरही त्यांचा डोळा चकवून वन्यप्राण्यांचे कळप शिवारात घुसत पिकांचे नुकसान करीत आहेत. काढणी आणि मळणी सुरू असतानाच तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी कुटुंबे अक्षरशः मेटाकुटीला आली आहेत.

ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता मोठ्या कष्टाने जतन केलेला घास रातोरात हिरावल्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येथील पिकाखालील क्षेत्र संपून शेती केवळ सातबारावरच शिल्लक राहील. - मीनल मस्कर, सरपंच, कसणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com