Agriculture news in Marathi Very little sowing in Khandesh | Agrowon

खानदेशात अत्यल्प पेरणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी महागडे बियाणे पेरणी शेतकऱ्यांनी टाळली आहे. फक्त पाच टक्के क्षेत्रातच पेरणी झाल्याची माहिती आहे. 

जळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी महागडे बियाणे पेरणी शेतकऱ्यांनी टाळली आहे. फक्त पाच टक्के क्षेत्रातच पेरणी झाल्याची माहिती आहे. 

पेरणीला खऱ्या अर्थाने सुरवातच झालेली नाही. पेरणी सुरू नसल्याने बियाणे, खते बाजारातही फारशी उलाढाल नाही. खानदेशात जूनमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. पाऊस पडतो, पण लागलीच रखरखते ऊन असते. यात जमिनीत वाफसा नाही. जमीन लागलीच कोरडी पडते. कुठेही ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नसल्याची स्थिती आहे. 

खानदेशात जळगाव जिल्ह्यात एकूण सात लाख ६८ हजार हेक्टरवर, धुळ्यात पावणेचार लाख हेक्टरवर आणि नंदुरबारात सुमारे दोन लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. यात फक्त पूर्वहंगामी (बागायती) कापसाचीच लागवड झाली आहे. कोरडवाहू कापूस, सोयाबीनची पेरणी कुठेही झालेली नाही. बियाणे महाग असल्याने शेतकरी पेरणी टाळत आहेत. दुबार पेरणीचा खर्च वाढल्यास वित्तीय अडचणी वाढतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

कृषी विभागही वारंवार ४५ ते ६० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, असे सांगत आहे. ज्वारी, उडीद, मूग, तूर यांची पेरणीदेखील रखडली आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जळगावचा दक्षिण भाग, एरंडोल आदी क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापूस, मूग, उडदाची पेरणी केली आहे. या भागात अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने स्थिती बरी आहे. पण चोपडा, यावल, जळगावचा उत्तर भाग, भुसावळ, बोदवड आदी भागात पेरण्यांना गतीच आलेली नाही. धुळ्यातही शिंदखेडा, शिरपूर, धुळे आदी भागात पेरणी सुरू झालेली नाही. पेरण्या रखडल्याने किंवा लांबल्याने शेतकऱ्यांचाही हिरमोड होत आहे. 

कारण यंदा पाऊस चांगला येईल, असे सुरवातीपासून सांगितले जात होते. परंतु नेमका पेरणीच्या वेळी पाऊस खानदेशात हवा तसा नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सकाळी ऊन, दुपारी सुसाट वारा व सायंकाळी ढगाळ वातावरण किंवा तुरळक पाऊस, अशी स्थिती अनेक भागात असते. गुरुवारी (ता. १७) सायंकाळीदेखील जळगाव, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव आदी भागात हलका ते मध्यम आणि काही मंडळांमध्ये तुरळक पाऊस झाला. जोरदार पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...