Agriculture news in marathi; Very little stock in the Acolyte project | Agrowon

अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

अकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने उलटून गेले तरी मोठे, मध्यम, लघू अशा सर्वच प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा आहे. अपवाद फक्त वान या एकमेव प्रकल्पाचा आहे. वान प्रकल्पात सध्या ४०७.७० मीटर पाणीसाठा झालेला असून तो ७६.८६ टक्के इतका झालेला आहे.

अकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने उलटून गेले तरी मोठे, मध्यम, लघू अशा सर्वच प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा आहे. अपवाद फक्त वान या एकमेव प्रकल्पाचा आहे. वान प्रकल्पात सध्या ४०७.७० मीटर पाणीसाठा झालेला असून तो ७६.८६ टक्के इतका झालेला आहे.

जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे मोठे; तर मोर्णा, निर्गुणा, उमा हे मध्यम आणि दगडपारवा, पोपटखेड हे लघुप्रकल्प आहेत. सद्यःस्थितीत काटेपूर्णा प्रकल्पात ७.८८१ मीटर म्हणजेच ९.१२ टक्के एवढा साठा झालेला आहे. मोर्णा प्रकल्पात ८.६९ मीटर साठा असून २०.९५ टक्केवारी आहे. निर्गुणा प्रकल्पात ४.०५ मीटर (१४.०४ टक्के), उमा प्रकल्पात ०.८५६ मीटर (७.३२ टक्के) आणि पोपटखेड प्रकल्प एक मध्ये ५.६१ (५१.७४ टक्के) व दोनमध्ये ४.६२ मीटर (६४.२२ टक्के) साठा आहे. दगडपारवा या प्रकल्पात तर एक थेंबही साचलेला नाही.

काटेपूर्णा या प्रकल्पावरून सिंचनाच्या तुलनेत पाणीपुरवठा योजना अधिक आहेत. अडीच महिन्यांत केवळ १० टक्केही उपयुक्त साठा झालेला नाही. यामुळे भविष्यात प्रकल्पावर आधारित पाणीपुरवठा योजनांच्या गावात तीव्र टंचाईची शक्यता आहे. या प्रकल्पावरून जिल्ह्यातील इतर पाणीपुरवठा योजना व अकोला औद्योगिक वसाहतीसाठी मिळून सुमारे ४० दलघमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासते. प्रकल्पाची एकूण क्षमता ९७.६७ दलघमी आहे. त्यात ११.३२ दलघमी मृत; तर ८६.३५ उपयुक्त जलसाठा आहे. मंगळवारअखेरीस (ता. २०) प्रकल्पात असलेल्या जलसाठ्यानुसार उपयुक्त जलसाठा ७.७४ दलघमी एवढाच आहे. मृत व उपयुक्त जलसाठा मिळून १८.७६ दलघमी जलसाठा आहे. 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...