जळगाव जिल्ह्यात पीककर्जाचे अत्यल्प वाटप

जळगाव ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत फक्त एक लाख ४१ हजार ४४ शेतकऱ्यांना ५६९ कोटी १३ लाख ४३ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. लक्ष्यांक २८९२ कोटी ६८ लाख २३ हजार रुपयांचा आहे. या तुलनेत पीककर्ज वाटप अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. पीककर्ज वितरणाची गती, टक्केवारी अतिशय कमी असल्याची स्थिती असून, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Very low distribution of crop loan in Jalgaon district

शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्‍यक असणारे बी-बियाणे व खते खरेदी करता यावीत तसेच मशागतीची कामे करता यावीत, यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या व इतर शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी पीककर्ज उपलब्ध होण्याची गरज होती.

२०२०-२१ साठी खरीप कर्जवाटपाचा २८९२ कोटी ६८ लाख २३ हजार रुपयांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे; तर रब्बीसाठी ४४७ कोटी २२ लाख ३६ रुपयांचा लक्ष्यांक, असा एकूण खरीप व रब्बी हंगामासाठी ३३३९ कोटी ९० लाख ५९ हजार रुपयांचा दिलेला आहे. अर्थात आता जून महिना संपला तरीदेखील फक्त ५६९ कोटी १३ लाख ४३ हजार रुपये पीककर्ज वितरित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने वाटप केलेल्या १ लाख ३५ हजार ४३ पैकी ८६ हजार २१३ कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना २६९ कोटी २८ लाख रुपये कर्जवाटप केले आहे.

जिल्हा बँकाचा सर्वाधिक वाटा या पीककर्ज वाटपात सर्वाधिक वाटा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा असून, या बॅंकेने १ लाख ३५ हजार ४३ शेतकऱ्यांना ४४२ कोटी १६ लाख रुपये पीककर्जाचे वाटप केले आहे; तर राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४ हजार ३३५ शेतकऱ्यांना ६९ कोटी एक लाख ७७ हजार रुपये, ग्रामीण बॅंकांमार्फत १६१ शेतकऱ्यांना एक कोटी ८० लाख ३९ हजार रुपये, खासगी बॅंकांमार्फत एक हजार ५०५ शेतकऱ्यांना ५६ कोटी १५ लाख २७ हजार रुपये याप्रमाणे सर्व बॅंका मिळून जून २०२० अखेर ५६९ कोटी १३ लाख ४३ हजार रुपये पीककर्ज वाटप केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com