Agriculture news in Marathi Veterinarians will shut down home delivery services | Agrowon

पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना वॉरियर्स म्हणून मान्यता न दिल्यास यापुढील काळात घरपोच दिल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेसह काही सेवा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने दिला आहे.

नागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना वॉरियर्स म्हणून मान्यता न दिल्यास यापुढील काळात घरपोच दिल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेसह काही सेवा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने दिला आहे. पशुसंवर्धन आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून हा इशारा दिला आहे.

निवेदनानुसार, कोरोना महामारीच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पशुवैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शुद्ध आणि निरोगी दूध, अंडी आणि मांस उत्पादनासाठी पशू आरोग्य सेवा देणाऱ्या पशुवैद्यकांच्या सेवादेखील अत्यावश्यक ठरतात. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात अविरत पशुवैद्यकीय सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी हे देखील फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना वॉरियर्स आहेत, अशी संघटनेची ठाम धारणा आहे. मात्र एकीकडे पशुवैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक आणि त्या सेवांमुळे उत्पादित होणारी उत्पादने कोरोनाबाधित नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने जाहीर केली.

त्याचवेळी दुसरीकडे सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मात्र फ्रंटलाइन वर्कर्स आणि कोरोना वॉरियर्स म्हणून मान्यता देण्यास मात्र शासन टाळाटाळ करीत आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. कोरोना काळात अनेकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचे प्रमाण खूप अधिक आहे. असे असतानाही या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यास आणि लसीकरणाला प्राधान्य देण्यासाठी देखील शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिणामी, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे संताप आणि भीती अशा दुहेरी भावना निर्माण झाल्या आहेत.

यापूर्वीच्या निवेदनांना शासन स्तरावरून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सर्व अधिकारी नाइलाजाने आणि नैराश्याने बुधवार (ता. १२) पासून शासन नियमानुसार काम करणार आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला व आम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता कमी राहील, असा विश्‍वासही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. त्याकरिता घरपोच दिल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा बंद करणे, दवाखान्यात केवळ गंभीर स्वरूपाच्या पशुवैद्यकीय सेवा देणे तसेच विभागांतर्गत सर्व संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के राहील, असा निर्णय संघटनेने घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष रामदास गाडे, सरचिटणीस संतोष वाकचौरे, शशिकांत मांडेकर यांनी हे निवेदन दिले आहे.


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...