पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या आरोग्यास धोका 

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कामधेनू योजनेतील पशुचिकित्सा शिबिरे रद्द करावी लागली आहेत.
Veterinary camps canceled, endangering animal health
Veterinary camps canceled, endangering animal health

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कामधेनू योजनेतील पशुचिकित्सा शिबिरे रद्द करावी लागली आहेत. परिणामी, काही जनावर मालक शासकीय पशुचिकित्सालयात येऊन स्वतःहून जनावरांची आरोग्य तपासणी व उपचार घेत आहेत; तर काहीजण जनावरांची तपासणी व उपचार टाळत असल्याने जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. 

शासकीय पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात कामधेनू योजनेअंतर्गत गावोगावी शिबिरे घेण्यात येतात. त्या- त्या गावातील जनावरांची आरोग्य तपासणी या शिबिरात होते. एक दिवसात तीन गावांत हे शिबिर होते. या शिबिरात जनावरांना लस देणे, जंताचे औषध देणे, वंध्यत्व तपासणी करणे अशी कार्य केली जातात. शिबिरात एकाच वेळी जास्त संख्येने जनावरे व त्यांच्यासोबत मालक येतात. त्यामुळे गर्दी होते. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन पुकारला आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी जनावरांचे आरोग्य शिबिर घेणे टाळले जात आहे. तसेच, जनावरांची वाहतूक करणे शक्‍य झालेले नाही, तसेच शिबिरे घेणेही अशक्य बनले 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com