Agriculture news in marathi Veterinary clinics in Pune district to be set up online | Agrowon

पुणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने होणार ऑनलाइन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. प्रायोगिक तत्त्वावर काम करत असताना, त्यात येणाऱ्या अडचणींचाही अभ्यास केला जात आहे. या समस्यांवर मार्ग काढून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज ऑनलाइन केले जाईल. 
- डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

पुणे : ‘महावेट नेट’ या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने ऑनलाइन जोडण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात पशुपालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा, दैनंदिन कामकाजाच्या सर्व नोंदी ऑनलाइन पद्धतीने नोंदविल्या जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू असून, लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. 

जिल्ह्यातील २२८ प्रथम व द्वितीय श्रेणी दवाखान्यांतून पशुवैद्यक सहायकांमार्फत पशुपालकांना सेवा देण्यात येतात. शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन वैद्यकीय सेवा, सुविधा देण्याबरोबरच या पशुवैद्यकांना १९ प्रकारच्या नोंदणी पुस्तिका (रजिस्टर) हाताने लिहाव्या लागतात. दवाखान्यात आलेल्या जनावरांचे केसपेपरही तयार करावे लागतात. ही सर्व कामे आता ऑनलाइन होणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून टॅब आणि इंटरनेट जोडणी देण्यात येणार आहे. 

ऑनलाइन नोंदणीमुळे बोगस आकडेवारी, खोट्या नोंदणी राहणार नाही. शेतकऱ्यांनाही ही माहिती सहज उपलब्ध होणार आहे. शिवाय पशुधनाला मिळालेल्या वैद्यकीय सेवा आणि सुविधांविषयी दर तीन महिन्याला मेसेजही मिळणार आहे.

संगणकीय प्रणालीमध्ये पशुपालकाचे नाव, गाव, जनावरांची माहिती, दिनांक, केलेली तपासणी, वासराचा जन्म, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, या सेवा सुविधांची नोंद ऑनलाइन घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे एका क्लिकवर केस पेपरही तयार होणार आहे.    

अद्यापही सर्व दवाखान्यांना टॅबवाटप, तसेच नेट जोडणी दिलेली नाही. पशुवैद्यक सहायक शेतकऱ्यांच्या गोठ्यावर भेटी देतात. अशा वेळी उपचाराचे साहित्य आणि टॅबची ने-आण करणे जिकिरीचे ठरणार आहे. जनावरांचा टॅग नंबर, पशुपालक मोबाईल नंबर व इतर नोंद करावी लागत असल्याने हे काम वेळखाऊ आणि किचकट आहे. त्यामुळे माहिती भरायची कधी आणि पशुचिकित्सा करायची कधी, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागात इंटरनेट जोडणीत अडचणी असल्याने ऑनलाइन नोंदणी घेताना अडचणी येतात. या समस्यांचा संघटनेच्या स्तरावरही आढावा घेतला जात असून, अडचणी दूर झाल्यानंतर सर्व दवाखान्यांचे कामकाज ऑनलाइन करण्यात येणार आहे.    


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...