वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय : डॉ. विनय कोरे

येथील वारणा सहकारी दूध संघाच्या वतीने पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि जनावरांच्या उपचारासाठी अद्ययावत प्रयोगशाळा लवकरच सुरू करणार,अशी घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली.
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय :  डॉ. विनय कोरे Veterinary College to be set up in Warne: Dr. Vinay Kore
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय : डॉ. विनय कोरे Veterinary College to be set up in Warne: Dr. Vinay Kore

वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी दूध संघाच्या वतीने वारणानगरमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि जनावरांच्या उपचारासाठी अद्ययावत प्रयोगशाळा लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली. 

तात्यासाहेब कोरेनगर येथे वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर मंगळवारी सभासदांच्या उपस्थितीत ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यावेळी कोरे बोलत होते. या वेळी वारणा दूध संघाचे सर्व संचालक, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, जि. स. सदस्य अशोकराव माने, शिवाजी मोरे, सीए अॅड. रणजित शिंदे यांच्यासह वारणा उद्योग समूहातील पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते. 

कोरे म्हणाले, ‘‘गेले दोन वर्ष अतिवृष्टी व कोरोना संकटामुळे शेतकरी, दूध उत्पादक यांना फार मोठा फटका बसला. पण वारणा दूध संघाने एकही दिवस दूध संकलन व उत्पादने बंद न ठेवता दूध उत्पादकांसह ग्राहकांची गरज वेळेत पूर्ण केली. संघाने रिटेल मार्केटिंग, ट्रेडिंग व्यवसाया मध्ये धाडसाने उतरून १७६ कोटींची विक्री केली. अडचणीच्या काळातही संघाने प्रगती साधली आहे.

संघाच्या कॅडबरी विभागाने तर ९६९ ५ टन बोर्नर्व्हीटाचे उत्पादन घेतले असून, या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा हजार कोटींचा विस्तार प्रकल्प लवकरच सुरू करणार आहे. कोल्हापूर, मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमधून दूध उत्पादनांची शॉपी उभारण्यात येणार आहे. गेले दोन वर्ष अतिवृष्टी व कोरोनाच्या संकट काळातही दूध संघाने सुमारे ८८७ कोटींची वार्षिक उलाढाल आणि ३५ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. ’’ 

बिहारला पाठविले दूध  बिहारच्या पाटना मिल्क संघास ८१ लाख लिटर दुधाचा पुरवठा केला असून, जुलैपर्यंत हा पुरवठा संघाकडून सुरू राहणार आहे. बिहारला दूध पाठविण्याच्या निर्णयामुळे शिल्लक दुधाचा प्रश्न मिटला आहे. लवकरच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना दूध पुरवठा करण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष कोरे यांनी सांगितले. 

दूध उत्पादकांना देणार सुविधा  संघास दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी दूध संस्थांना ८५ पैसे ऐवजी १ रुपया कमिशन देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. जनावरांना कोणताही आजार झाल्यास त्याचवेळी त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत व चांगल्या जनावरांची पैदास व्हावी, या दृष्टिकोनातून अद्ययावत प्रयोगशाळा वारणेत उभारण्यात येणार आहे.

वारणा दूध संघ व वारणा शिक्षण मंडळाच्या माध्यमांतून पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच जातिवंत दुधाळ जनावरांची पैदास कार्यक्रमांतर्गत जातिवंत परदेशी वळूंच्या विर्यमात्रा व जातिवंत सॉर्टेड सिमेन दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. 

--- 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com