agriculture news in marathi Veterinary doctors on indefinite strike in Baramati taluka | Agrowon

बारामती तालुक्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर बेमुदत संपावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

पुणे : बारामती तालुक्यातील खासगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी बुधवारपासून ( ता. २२) बेमुदत संप पुकारला आहे. मागण्या मान्य पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर असतील, अशी माहिती पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ बारामतीकडून देण्यात आली. 

पुणे : बारामती तालुक्यातील खासगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी बुधवारपासून ( ता. २२) बेमुदत संप पुकारला आहे. मागण्या मान्य पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर असतील, अशी माहिती पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ बारामतीकडून देण्यात आली. 

राज्यातील सर्व खासगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या लोकांना निबंधक एम. एस. व्हीसी विनाकारण नाहक त्रास देत आहेत. संविधानाने भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ च्या कलम ३० (ख) व कलम ५७ (१) बाबतीत दुर्लक्ष करून व वर्तमानपत्रात चुकीची माहिती प्रसारित केली. त्याद्वारे बदनामी करण्यात येत आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या वतीने वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल, खुलासा केला जात नाही. त्यामुळे  हा संप पुकारण्यात आला आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद 

‘‘संप पुकारल्यानंतर होणाऱ्या पशुधनाच्या नुकसानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील. खासगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे शहर व तालुक्यात पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत नालंदे, डॉ. रमजान तांबोळी, सचिव डॉ. विशाल घनवट यांच्यासह १५०डॉक्टर आहेत. हे सर्व संपावर गेले आहेत,’’ असे संघाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.  


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...