पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत संप सूरू 

पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून आंदोलन पुकारले आहे. परंतु मागण्यांची दखल घेत नसल्याने रविवारपासून (ता. १) पशु सेवेसह सर्व कामकाज बंद करत बेमुदत संप सुरू केला.
animal
animal

नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून आंदोलन पुकारले आहे. परंतु मागण्यांची दखल घेत नसल्याने रविवारपासून (ता. १) पशु सेवेसह सर्व कामकाज बंद करत बेमुदत संप सुरू केला. आंदोलनात राज्यातील २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी झाले आहेत. मात्र या बंदमुळे राज्यातील आठ कोटी पशुसेवेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ग्रामीण भागातील श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावर, (पदविकाधारक) शस्त्रक्रिया वगळता सर्व कामे करतात. महाराष्ट्र पशुवैद्यक परिषद १९७१ अन्वये नोंदणी करुन स्वतंत्र काम करता येत होते. मात्र १९८४ च्या भारतीय पशुवैद्यक कायदा लागू झाल्यानंतर काम करण्याला अडचणी आल्या. पुन्हा १९९७ मध्ये अधिसूचना काढून स्वतंत्र काम करण्याला मान्यता दिली. परंतु २००९ मध्ये पुन्हा अधिसूचना काढल्याने २१ कामांपैकी कृत्रिम रेतन वगळता पशुधन विकास अधिकारी यांच्या देखरेखी व निदर्शनाखाली काम करावे लागत आहे. 

संघटनेने पंधरा जीवनापासून आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात दहा दिवस लसीकरण व अहवाल बंद आंदोलन, दुसऱ्या टप्प्यात १६८ आमदार व १० खासदारामार्फत राज्य सरकारला पत्रे, तिसऱ्या टप्प्यात कायद्याप्रमाणे काम केले परंतु दीड महिन्यात दखल घेतली नसल्याने काल (रविवार १ ऑगस्ट) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बहुतांश भागात पशुसेवा ठप्प झाली आहे. आंदोलनात राज्यातील २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. 

पशुसंवर्धन विभागाने संघटनेच्या मागणीचा विचार करून आंदोलन करण्याची वेळ येऊ द्यायला नको होती, अशी भावना संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनावळे, सरचिटणीस डॉ. नितीन निर्मळ, कार्याध्यक्ष डॉ. संजय कढणे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुधाकर लांडे, कोषाध्यक्ष डॉ. गंगाधर निमसे यांनी व्यक्त केली आहे.  यावर तोडगा निघाला नाही तर पशुआरोग्य सेवेचा शेतकऱ्यांना फटका सोसावा लागणार असल्याचे दिसत आहे.  आज मंत्रालयात बैठक  पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी उद्या (मंगळवारी) विधानसभा अध्यक्ष समिती कक्षात महसूलमंत्री बाबासाहेब थोरात, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, दत्ता भरणे, आमदार माणिकराव कोकाटे, मंजुळा गावित, मंगेश चव्हाण, सरोज अहिरे, नीलेश लंके, संजय जगताप, दिलीप मोहिते यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.  या आहेत मागण्या 

  • पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करावी 
  • पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट अ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती करू नये 
  • पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी 
  • ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मंजूर करावा 
  • पदविका प्रमाणपत्र धारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना २७ ऑगस्ट २००९ रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com