agriculture news in Marathi veterinary doctors on strike Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत संप सूरू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून आंदोलन पुकारले आहे. परंतु मागण्यांची दखल घेत नसल्याने रविवारपासून (ता. १) पशु सेवेसह सर्व कामकाज बंद करत बेमुदत संप सुरू केला.

नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून आंदोलन पुकारले आहे. परंतु मागण्यांची दखल घेत नसल्याने रविवारपासून (ता. १) पशु सेवेसह सर्व कामकाज बंद करत बेमुदत संप सुरू केला. आंदोलनात राज्यातील २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी झाले आहेत. मात्र या बंदमुळे राज्यातील आठ कोटी पशुसेवेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ग्रामीण भागातील श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावर, (पदविकाधारक) शस्त्रक्रिया वगळता सर्व कामे करतात. महाराष्ट्र पशुवैद्यक परिषद १९७१ अन्वये नोंदणी करुन स्वतंत्र काम करता येत होते. मात्र १९८४ च्या भारतीय पशुवैद्यक कायदा लागू झाल्यानंतर काम करण्याला अडचणी आल्या. पुन्हा १९९७ मध्ये अधिसूचना काढून स्वतंत्र काम करण्याला मान्यता दिली. परंतु २००९ मध्ये पुन्हा अधिसूचना काढल्याने २१ कामांपैकी कृत्रिम रेतन वगळता पशुधन विकास अधिकारी यांच्या देखरेखी व निदर्शनाखाली काम करावे लागत आहे. 

संघटनेने पंधरा जीवनापासून आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात दहा दिवस लसीकरण व अहवाल बंद आंदोलन, दुसऱ्या टप्प्यात १६८ आमदार व १० खासदारामार्फत राज्य सरकारला पत्रे, तिसऱ्या टप्प्यात कायद्याप्रमाणे काम केले परंतु दीड महिन्यात दखल घेतली नसल्याने काल (रविवार १ ऑगस्ट) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बहुतांश भागात पशुसेवा ठप्प झाली आहे. आंदोलनात राज्यातील २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. 

पशुसंवर्धन विभागाने संघटनेच्या मागणीचा विचार करून आंदोलन करण्याची वेळ येऊ द्यायला नको होती, अशी भावना संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनावळे, सरचिटणीस डॉ. नितीन निर्मळ, कार्याध्यक्ष डॉ. संजय कढणे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुधाकर लांडे, कोषाध्यक्ष डॉ. गंगाधर निमसे यांनी व्यक्त केली आहे. 
यावर तोडगा निघाला नाही तर पशुआरोग्य सेवेचा शेतकऱ्यांना फटका सोसावा लागणार असल्याचे दिसत आहे. 

आज मंत्रालयात बैठक 
पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी उद्या (मंगळवारी) विधानसभा अध्यक्ष समिती कक्षात महसूलमंत्री बाबासाहेब थोरात, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, दत्ता भरणे, आमदार माणिकराव कोकाटे, मंजुळा गावित, मंगेश चव्हाण, सरोज अहिरे, नीलेश लंके, संजय जगताप, दिलीप मोहिते यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. 

या आहेत मागण्या 

  • पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करावी 
  • पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट अ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती करू नये 
  • पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी 
  • ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मंजूर करावा 
  • पदविका प्रमाणपत्र धारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना २७ ऑगस्ट २००९ रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी 
     

इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...