पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीची गरज : गावित

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीची गरज : गावित
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीची गरज : गावित

नाशिक : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी ऊन, पावसात जनावारांची सेवा करतात. मात्र, पशुवैद्यकीय दवाखान्यांची दयनीय स्थिती आहे. त्याच्या दुरुस्तीची गरज आहे. अर्थसंकल्पात दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नाही. परंतु, दवाखाने दुरुस्तीकरिता निधी मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन समितीच्या सभापती नयना गावित यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागातर्फे आदर्श गोपालक, अधिकारी व कर्मचारी पुरस्काराचे वितरण उपाध्यक्षा गावित यांच्या हस्ते करण्यात आले. गावित यांनी दोन वर्षांत केलेल्या पशुसवंर्धन विभागांतर्गत कामाचा लेखाजोखा मांडला. विभागाचा नावलौकिक वाढविण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. गिते म्हणाले, ‘‘शेतीला पूरक समजला जाणारा हा व्यवसाय आता मुख्य व्यवसाय झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यात पशुधन साभांळण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे.’’

 पशुसंवर्धन विभागासाठी अर्थसंकल्पातील निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कुभांर्डे यांनी सांगितले. या वेळी आदर्श गोपालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी प्रस्ताविक केले.या वेळी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, दीपक शिरसाठ, महेंद्र काले, समाधान हिरे, सुरगाणा पंचायत समिती सभापती सुवर्णा गांगुर्डे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी उपस्थित होते.

गुणवंत पशुपालक

सुनील देवरे, मनाजी ह्यालीज, सचिन मिंदे, दत्तात्रेय गव्हाणे, प्रल्हाद उफाडे, परशुराम जगताप, विनोद बर्वे, राजेंद्र पवार, बाळासाहेब देवरे, जयराम महाले, सखाहरी लासुरे, विष्णू चव्हाण, कोमल चव्हाण, जनक कुंदे, परशुराम पाडवी.

गुणवंत पशुधन विकास अधिकारी

डॉ. प्रशांत साळवे, डॉ.,अंशुजा नागदिवे, डॉ. हेमंत कुलकर्णी, डॉ. नितीन कनोज, डॉ. सुवर्णसिंग पाडवी, डॉ. विजय पाटील, डॉ. सुनील बळवंतकर, डॉ. दीपाली कांबळे, डॉ. प्रदीप गायकवाड, डॉ. प्रकाश पाडळे, डॉ. राकेश बडे, डॉ. ललिता नाळे, डॉ. श्रीनिवास पावटेकर, डॉ. महेंद्र पन्हाळे, डॉ. कविता पाटील.

गुणवंत सेवक

तुळशीदास बागुल, दिलीप जाधव, सुहास कांबळे, महादू गावीत, सुहास आहिरे, लक्ष्मण कुमावत, अशोक अडगळे, लहू अहिरे, भाऊसाहेब पवार, रतन ढवळे, सुविधा अडकमोल, भगवान भुसारे, निवृत्ती आहेर, कैलास सुलाने, अरुण ततार.

गुणवंत सेवक (परिचर)

अशोक गायकवाड, रमेश फसाळे, मनोज म्हस्के. दिलीप भदाणे, प्रवीणकुमार कु­ऱ्हे, प्रल्हाद घंगाळे, गणेश वाजे, बाळकिसन सुरवसे, दिपाली महाले, हरिश्‍चंद्र रनमाळे, ज्ञानेश्वर रसाळ, सुनील शिंदे, दीपक माळवाळ, उत्तम चौरे, परसराम इंफाळ, सोनगीर गोसावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com