Agriculture news in marathi Veterinary professional The organization will agitate | Agrowon

पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार आंदोलन 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्यांसंदर्भाने आयोजित बैठकीत ११ पैकी दोन मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्तांची ही भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत संघटनेने मंगळवारपासून (ता. १५) आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्यांसंदर्भाने आयोजित बैठकीत ११ पैकी दोन मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्तांची ही भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत संघटनेने मंगळवारपासून (ता. १५) विविध टप्प्यांवर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने अकरा मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले होते. त्यावर चर्चेकरिता पशुसंवर्धन आयुक्तांकडून निमंत्रण अपेक्षित होते. परंतु आयुक्तांकडून या निवेदनाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.७) पशुसंवर्धन आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या वेळी देखील ११ पैकी दोन मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आली.

संबंधित कार्यालयाची ही भूमिका पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या विरोधी आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून पशुपालकांना वेठीस न धरता चर्चेतून या समस्यांचे निराकरण व्हावे, अशी अपेक्षा संघटनेला होती. परंतु प्रशासनाने मागण्यांची कोणतीच दखल न घेतल्याने अतिरिक्त संघटनेने मंगळवारपासून (ता. १५) विविध टप्प्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

असे असेल आंदोलन 
मंगळवारपासून (ता. १५) लसीकरण, सर्व ऑनलाइन, मासिक तसेच वार्षिक अहवाल देणे बंद त्यासोबतच आढावा बैठकांनादेखील संवर्गातील सदस्य उपस्थित राहणार नाहीत. शुक्रवारपासून (ता.२५) राज्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य यांना निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात १६ जुलैपासून कायद्याप्रमाणे काम केले जाईल. त्यासोबतच सर्व शासकीय व्हाट्स ॲपग्रुप मधून बाहेर पडण्याचा निर्णय देखील संवर्गातील सदस्यांनी घेतला आहे.

प्रशासनाकडून त्यानंतरही मागण्यांची दखल घेण्यात आल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सुनील काटकर, कार्याध्यक्ष डॉ. डी. आर. चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. पवन भागवत, सरचिटणीस डॉ. एस. बी. कानोले यांनी या संदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे. 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...