Agriculture news in marathi Of veterinary professionals Behind the work stop movement | Agrowon

नगर : पशुचिकित्सा व्यवसायिकांचे  काम बंद आंदोलन मागे 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

पशुचिकित्सा व्यावसायिक (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने केलेल्या मागण्या पंधरा दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेतले आहे.

नगर : पशुचिकित्सा व्यावसायिक (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने केलेल्या मागण्या पंधरा दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. मंगळवारी (ता. ३) मंत्रालयात मंत्री, आमदार, संबंधित विभागाचे अधिकारी व संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीनंतर संघटनेने आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बुधवारपासून (ता. ४) पशुचिकित्सा सेवा नियमित सुरू झाली आहे. 

पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करावी. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट ‘अ’ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट ‘अ’ पंचायत समिती करू नये. पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी. ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मंजूर करावा.

पदविका प्रमाणपत्रधारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना २७ ऑगस्ट २००९ रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी, यासह अन्य मागण्यासाठी पशुचिकित्सा व्यावसायिक (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने १५ जूनपासून वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन केले. 

सरकारी पातळीवर आंदोलनाची दखल घेतली नसल्याने एक ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्याचा परिणाम राज्यातील पशुसेवेवर दिसून आला. 
राज्यात २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यावसायिक काम करत आहेत. त्यातील पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी बहुतांश लोक आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले जात होते. 

कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर सरकार पातळीवर आंदोलनाची दखल घेऊन मंगळवारी सायंकाळी मंत्रालयातील विधानसभा अध्यक्ष समिती कक्षात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महसूल मंत्री बाबासाहेब थोरात, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माणिकराव कोकाटे, मंजुळा गावित, मंगेश चव्हाण, सरोज अहिरे, नीलेश लंके, प्रधान सचिव गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील काटकर, डॉ. मारुती कानवले, डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे, डॉ. भगवान पाटील, संजय पाटील, पवन भागवत, कैलास चोनकर, डॉ. आरोटे, डॉ. पोखरकर, डॉ. फटांगरे, डॉ. पावसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

पंधरा दिवसांत मागण्या मान्य करू आणि  पशुचिकित्सा व्यावसायिकांना स्वतंत्र कामाचे अधिकार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे बैठकीत आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारपासून राज्यात पशुसेवा सुरळीत सुरू झाली, अशी माहिती नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर सोनावळे यांनी दिली आहे.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...