आटपाडीतील पशुवैद्यकीय सेवा ‘दैव भरोसे’

आटपाडीपासून आमचे गाव आठ किलोमीटरवर आहे. गावात जनावरांच्या सेवेसाठी डॉक्‍टरांना तेथील काम सोडून येता येत नाही. शेतकऱ्यांना सरकारी आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. - बजरंग लेंगरे, शेतकरी (लेंगरेवाडी)
Veterinary Services 'Divine Trusts' in Attapadi
Veterinary Services 'Divine Trusts' in Attapadi

आटपाडी, जि. सांगली : राज्य सरकारच्या धोरणानुसार आटपाडी तालुक्‍यात ६० गावांतील ६५००० जनावरांच्या आरोग्य सेवेसाठी वीस पशुवैद्यकीय दवाखाने आणि तेवढेच पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र तालुक्‍यात आठच दवाखाने आणि केवळ पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे जवळपास ५० गावांना पशुवैद्यकीय सेवा मिळत नाही. पशुवैद्यकीय सेवा नावाला आणि एकपण नाही कामाला, अशी अवस्था आहे. 

राज्य सरकारचे शहरी भागासाठी पाच हजार, तर ग्रामीण भागात साडेतीन हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय दवाखाना आणि वैद्यकीय अधिकारी असावा, असे धोरण आहे. तालुक्‍यात साठ महसुली गावे आहेत. शेतीला शेतीपूरक म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तालुक्‍यात मोठ्या जनावरांची ६५ हजारावर संख्या आहे. धोरणानुसार, यासाठी २० पशुवैद्यकीय दवाखाने आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र तालुक्‍यात आठ दवाखाने आणि पाच अधिकारी आहेत. 

आटपाडी, करगणी, दिघंची, निंबावडे, झरे, घरनिकी येथे श्रेणी-१ आणि खरसुंडी व नेलकरंजी येथे हे श्रेणी-२ चा दवाखाना आहे. आठ दवाखान्यांसाठी आठ पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद आहे. प्रत्यक्षात मात्र पशुधन विकास अधिकारी आणि तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संपूर्ण तालुक्‍याचा डोलारा आहे. उपचारांसाठी मदत करणाऱ्या परिचारकांची चार पदे रिक्त आहेत.

अपुरे दवाखाने आणि रिक्त पदांमुळे तालुक्‍यातील जवळपास ५० गावातील ५० हजार जनावरांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. नेमणूक असलेल्या गावातून या डॉक्‍टरांना खेडेगावात जाताच येत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा पूर्ण विस्कळित झाली आहे. 

नेमणूक जनावरांसाठी; काम मात्र योजना, महोत्सवाचे

अगोदरच कमी संख्या आणि रिक्त पदे आहेत. त्यात कर्मचाऱ्यांना छावण्या, यात्रा महोत्सव, शिबिरे, लसीकरण, नावीन्यपूर्ण योजना राबवणे, आर सिटी योजना, महामेष योजनेचे वाटप यांसारखी कामे करावी लागतात. नेमणूक ज्यासाठी केली आहे, त्या सेवेचे काम करता येत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com