Agriculture news in marathi Veterinary work stoppage The agitation hit the farmers | Agrowon

पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे. उपचाराअभावी गुरांचे उपचार करणे अशक्य झाले आहे.

रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे. उपचाराअभावी गुरांचे उपचार करणे अशक्य झाले आहे. संप काळातही राज्य शासनाच्या राजपत्रात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेला २२ सेवा देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पशुचिकित्सक कोणत्याही सेवा देत नसल्यामुळे आजारी गुरांचे मृत्यू होत असल्याने याचा फटका मात्र पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे. 

खासगी व शासकीय सेवेतील पदविकाधारक पशुचिकित्सक संघटनांनी काम बंद आंदोलन पावसाळ्यात पुकारल्यामुळे शासन व संबंधित विभागापेक्षा शेतकरीच वेठीस धरला गेला आहे. सध्या पावसाळ्यात जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आजारी गुरांवर औषधोपचाराची गरज आहे. शेतकऱ्यांकडून गुरांवर उपचार होत नसल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मागील आठवड्यात भोकरखेडा येथे एक दुभती गाय, हराळ येथे नुकतीच व्यालेली म्हैस तर याच गावात काही बकऱ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. पशू पदविकाधारकांच्या मागण्यांबाबत शासनाने योग्य तो तोडगा काढावा व शेतकऱ्यांचे लाखमोलाचे पशुधन वाचवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही केली आहे. 
 
 


इतर बातम्या
कृषी कायद्यांना ठाम विरोधनवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या...
वादळ अरबी समुद्राच्या दिशेनेपुणे : बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘गुलाब’...
‘भारत बंद’ला राज्यात प्रतिसादपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा...पुणे : पूर्व भारतात असलेल्या वादळी प्रणालीच्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरूचपुणे ः राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र,...
ई-पीक पाहणीत एक गुंठा क्षेत्रात पीक...जळगाव : एक गुंठा क्षेत्रात ई-पीक पाहणी अॅपद्वारे...
द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
परभणी, हिंगोलीत संततधार सुरूच परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत...
कोल्हापूर जिल्ह्यात  भारत बंदला संमिश्र...कोल्हापूर : शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील...
‘पीएम किसान’च्या कामाची ‘कृषी’, ‘महसूल’...जळगाव : खानदेशात पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कृषी परिषद, विद्यापीठाला उच्च...पुणे ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या...
भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद अकोला : शेतकरी, कामगार कायदे तसेच वाढत्या महागाई...
‘एफआरपी’च्या तुकड्यांसाठी  राज्य...कोल्हापूर : केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे...
सोलापूर : डाळिंब केंद्रातर्फे शेतकरी,...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन...
परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद परभणी : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीन कृषी...
उत्तर सोलापुरात  अतिवृष्टीने पिकांचे...वडाळा, (जि. सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून...
‘भारत बंद’च्या माध्यमातून  केंद्र...नाशिक : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे व...
वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात  चंद्रपुरात...चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची तसेच...
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...