agriculture news in marathi Vice Chancellor selection Criteria doutable | Agrowon

कुलगुरू पात्रता निकषाबाबत संभ्रम कायम; बैठकीत निघाला नाही तोडगा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू पदासाठी देशभर समान पात्रता समान नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेला देखील हा संभ्रम दूर करता आलेला नाही.

पुणे : कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू पदासाठी देशभर समान पात्रता समान नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेला देखील हा संभ्रम दूर करता आलेला नाही.

कुलगुरू पदासाठी सध्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. त्यातही पुन्हा कुलगुरू निवडण्यासाठी राज्यपालाकडून नियुक्त करण्यात आलेली समिती राज्यांतर्गत देखील वेगवेगळे नियम लावते. परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी देशातील सर्व कुलगुरूंसोबत अलिकडेच घेतलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. 

कुलगुरू परिषदेत या पात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित होती. कुलगुरू निवडीची अर्हता एक असावी, असा मुद्दा एका विद्यापीठांकडून मांडला गेला. अर्थात, देशभर एकच अर्हता नव्हे तर या पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया देखील समान असावी, असा आग्रह काही विद्यापीठांचा आहे. 

महाराष्ट्रात एका कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडी प्रक्रियेत निवड समितीने एका उमेदवाराला अपात्र ठरविले होते. मात्र, चार महिन्यात दुसऱ्या निवड समितीने याच उमेदवाराला पात्र ठरविले. देशातील कृषी विद्यापीठे व फलोत्पादन विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना पात्रतेचे निकष समान नाहीत. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील समान अर्हता व प्रक्रियेतून व्हाव्यात, असे मत मांडले गेले आहे. याबाबत परिषदेकडून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

या वैठकीत आचार्य विद्यार्थ्यांची मदत घेण्याबाबत देखील चर्चा झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारित आचार्य (पीएचडी) झालेल्या विद्यार्थ्यांना मदतनीस अध्यापक (टिचिंग असिस्टंट) म्हणून नियुक्त करण्यास परिषद राजी झाली आहे. विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने  विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्याचा परिणाम अध्ययनावर देखील होतो. आचार्य विद्यार्थ्याची मदत घेतल्यास ही समस्या सुटेल, असे विद्यापीठांचे म्हणणे आहे. 

संशोधन कराराची प्रक्रिया किचकट
जगातील नामवंत कृषी संशोधन संस्थांसोबत देशातील कृषी विद्यापीठांकडून केल्या जात असलेल्या संयुक्त कराराची प्रक्रिया सोपी करण्याची मागणी विद्यापीठांची आहे.  कृषी शिक्षण व संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी असे करार केले जातात. हा मुद्दा कुलगुरू बैठकीत चर्चेला आला असताना परिषदेने विद्यापीठांना स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. “विदेशातील संस्थांसोबत करार केल्यामुळे संकल्पना व संशोधनाचे आदानप्रदान होते. मात्र, करार करताना अनेक अडचणींना विद्यापीठे सामोरे जातात. विद्यापीठांच्या कायद्यामध्येच अशा प्रकारच्या करारांना मान्यता देण्याचे समाविष्ठ असल्यास वेगळी मान्यता घेण्याची गरज नसल्याचा खुलासा केंद्र शासनाने केलेला आहे. ही पध्दत सुटसुटीत करण्याबाबत परिषदेने पुढाकार घेण्याची गरज आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...