agriculture news in Marathi, The victim of social, economic and political situation: Dr. Ashok Bang | Agrowon

शेतकरी सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा बळी ः डॉ. अशोक बंग

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 एप्रिल 2019

नाशिक : भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, तिसरी योग्य वाट तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीला शेतकरी सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा बळी ठरत असून, त्यांचा सन्मान धुळीस मिळत असल्याची खंत प्रसिद्ध कृषीतज्‍ज्ञ व पर्यायी कृषी संशोधन केंद्र चेतना विकास, वर्धा संस्थेचे संचालक डॉ. अशोक बंग यांनी केले.  के. के. वाघ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय येथे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

नाशिक : भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, तिसरी योग्य वाट तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीला शेतकरी सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा बळी ठरत असून, त्यांचा सन्मान धुळीस मिळत असल्याची खंत प्रसिद्ध कृषीतज्‍ज्ञ व पर्यायी कृषी संशोधन केंद्र चेतना विकास, वर्धा संस्थेचे संचालक डॉ. अशोक बंग यांनी केले.  के. के. वाघ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय येथे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

डाॅ. बंग म्हणाले, की समाजात शेती व शेतीसंबंधित असलेली आव्हाने असताना, शेतीचा जी. डी. पी. घसरता आहे. गेली अनेक अर्थसंकल्पांमध्ये शेतीला दुय्यम स्थान दिल्याचे जाणवते आहे. पूर्वी अर्थसंकल्पामध्ये २५ टक्क्यांवरुन ५ टक्क्यावर येऊन पोचली आहे. तसेच, या सर्वांचा परिणाम म्हणून शेतीतील मातीला सकसता सुपूर्तता व सजीवता मिळवून देण्याची गरज आहे. हे सांगत असताना सौरऊर्जेचे महत्त्व पटवून दिले. 

चेतना विकासच्या सहयोगी संचालक निरंजना मारु यांनी शेती कशासाठी व कोणासाठी यावर बोलताना जगात पीक उत्पादनास भारत अग्रेसर असताना देखील शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा पडत असल्याने तरुण शेतकरी शेतीकडे वळत नाही. अशा अडचणीच्या परिस्थितीत शेतकरी वर्गाला उभे राहायचे असेल तर स्वावलंबी शेतीचा मार्ग निवडायला हवा.

या वेळी व्यासपीठावर पर्यायी कृषी संशोधन केंद्र चेतना विकासच्या सहयोगी संचालक निरंजना मारु, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव के. एस. बंदी, विश्वस्त डॉ. नांदुरकर, आयटी विभाग प्रमुख प्रिती भामरे, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर आणि एम. के. सी. एल.चे प्रतिनिधी स्वप्नील बाहेती, श्रीनिवास खेर, पंकज पाटील, शुभम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणंची ओळख प्राचार्य व्ही. एस. संधान  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. सी. जाधव केले. तर प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व कृषी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 


इतर बातम्या
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...