विकासकामांमुळे मंद्रूपवासीयांचा विजयी कौल : मनीष देशमुख

विकासकामांमुळे मंद्रूपवासीयांचा विजयी कौल : मनीष देशमुख
विकासकामांमुळे मंद्रूपवासीयांचा विजयी कौल : मनीष देशमुख

सोलापूर : मंद्रूपच्या (ता. दक्षिण सोलापूर) सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या कलावती खंदारे या विक्रमी मताधिक्‍याने विजयी झाल्या. त्याबद्दल त्यांच्या मंद्रूप येथील निवासस्थानी भेट देऊन युवा नेते मनीष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. विकासकामांमुळे मंद्रूपवासीयांनी विजयी कौल दिला, अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली.

खंदारे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत कोरे-देशपांडे-नवले, कॉंग्रेस पुरस्कृत म्हेत्रे-टेळे-चव्हाण गटाचा पराभव करून सरपंचपदावर भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे सत्कार करताना देशमुख यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

मागील चार वर्षांतील दक्षिण सोलापूर मतदारसंघातील आणि प्रामुख्याने मंद्रूपमधील केलेल्या विकासकामांच्या जोरावर नागरिकांनी विजयी कौल भाजपला दिला, असे मत देशमुख यांनी या वेळी व्यक्त केले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातून तालुक्‍याचा विकास होत आहे. आपल्याला गावकऱ्यांनी सेवेची संधी दिली आहे. गावची प्रगती साधण्यासाठी विशेष सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. 

या वेळी प्रशांत कडते, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, रायाप्पा बन्ने, महेश मेंडगुदले, खंदारे परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com