Agriculture news in Marathi Vidarbha leaders aggressive from the Legislative Council | Page 2 ||| Agrowon

वैधानिक मंडळावरून विदर्भातील नेते आक्रमक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळांच्या मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित करून विदर्भातील नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा असल्याचे मानले जात आहे.

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळांच्या मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित करून विदर्भातील नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा असल्याचे मानले जात आहे. यापुढे विदर्भाचा निधी पश्‍चिम महाराष्ट्रात पळवला जाऊ नये याची खबरदारी भाजपसह काँग्रेसचेही नेते घेत असल्याचे समजते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा लगेच आपली भूमिका स्पष्ट केली.

या अगोदरही विरोधात असताना फडणवीस आक्रमकपणे विदर्भाच्या विकासाचे मुद्दे मांडायचे. विदर्भाचा अनुशेष आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी कसा आणि किती निधी पळवण्यात आल्याची आकडेवारी ते नियमितपणे विधानसभेत सादर करीत असे. नाना पटोले हेसुद्धा धान, सोयाबीन पिकांच्या माध्यमातून विदर्भावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडत असत. पटोले विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य राहिले आहे.

त्यामुळे वैधानिक मंडळे समन्यायी निधी वाटप आणि मागास भागांच्या विकासासाठी किती फायदेशीर आहे हे त्यांना ठाऊक आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पश्‍चिम महाराष्ट्राविषयी असलेल्या प्रेमाचीही त्यांना माहिती आहे. त्यामुळे वैधानिक विकास मंडळांना उपेक्षित ठेवणे हिताचे नसल्याने अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय काँग्रेस आणि भाजपतर्फे उपस्थित करण्यात आल्याचे बोलले जाते.

 थोडाफार अनुशेष दूर
वैधानिक विकास मडळांमुळे विदर्भासह मागास भागांचा थोडाफार अनुशेष दूर करता आला. निधीही उपलब्ध झाला. यापूर्वी कोणाला किती निधी मिळाला, पळवला याचे मोजमाप करण्याची सोयच नव्हती. नागपूर कराराचे पालनही केले जात नव्हते. एप्रिल २०२० पासून विकास मंडळांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लोकसंख्या आणि अनुशेषानुसार निधी मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही. मंडळे अस्तित्वात नसल्याने राज्यपालांकडेसुद्धा आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे तत्काळ मुदतवाढ देणे आवश्यक आहे, असे मत अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनी मांडले.

पटोलेंनी केला मुद्दा उपस्थित
संजय राठोड प्रकरणावर अधिवेशन गाजणार असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात पहिला दिवस विदर्भातील नेत्यांनी वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीवरून सरकारला घेतले. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ वैधानिक मंडळाचा मुद्दा उपस्थित केला आणि वादाला तोंड फोडले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेऊन विदर्भासह इतर तिन्ही विकास मंडळांना राज्य शासन मुदतवाढ देणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनाही नमते घ्यावे लागले.


इतर ताज्या घडामोडी
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...