Agriculture news in Marathi Vidarbha lost weight in the cabinet | Agrowon

मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील विदर्भाचे वजन घटले आहे.

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील विदर्भाचे वजन घटले आहे. कॅबिनेटमध्ये आता सातपैकी पाचच मंत्री विदर्भातील शिल्लक राहिले आहे. वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेस टाळाटाळ केली जात असून, वैदर्भीयांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने देशमुख यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा त्यांची भक्कम पाठराखण केली. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप, या दरम्यान अनिल देशमुख होम क्वारंटाइन असल्याने त्यांच्यावरच बालंट टळल्याचे बोलले जात होते.

उच्च न्यायालयानेसुद्धा परमबीर सिंग यांना चांगलेच फटकारले होते. त्यामुळे देशमुख दोन दिवसांपासून चांगलेच खूष होते. हा विषय संपला असेच सर्वांना वाटत होते. या दरम्यान विरोधकांच्या आरोपातील धारही कमी झाली होते. त्यामुळे आघाडी सरकार शाबूत असेपर्यंत अनिल देशमुख यांच्या पदाला धोका नाही, असेही त्यांचे समर्थक दावे करीत होते. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देऊन देशमुखांना चांगलाच धक्का दिला. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय देशमुखांना पर्याय राहिला नाही.

याविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. यासाठी देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तसेच सीबीआय चौकशीला लागणारा वेळ लक्षात घेता अनिल देशमुख यांना किमान सहा महिने लाल दिव्याशिवाय राहावे लागणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी यापूर्वी वनमंत्री राठोड यांनी राजीनामा दिला.

राजकारणात पाय ठेवल्यापासूनच लाल दिवा
अनिल देशमुख यांनी राजकारणात पाय ठेवला तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यावर लाल दिवा मिरवत होता. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. युतीच्या काळात मंत्री होते. महाविकास आघाडीच्या १५ वर्षांच्या काळात एक वर्षांचा अपवाद वगळता देशमुख सलग १४ वर्षे मंत्री होते. पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर देशमुखांना राष्ट्रवादीने गृहमंत्री करून पहिल्या रांगेत बसवले होते. मात्र अवघ्या दीड वर्षातच वादामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...