agriculture news in marathi, Vidarbha, Marathwada to get 22 thousand crore package for Development | Page 2 ||| Agrowon

विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार कोटींचे पॅकेज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 जुलै 2018

नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या विभागांचा सर्वांगीण विकास ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. या विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पूरक व्यवसाय उपलब्ध करत तसेच रोजगारनिर्मितीसाठी विशेष योजनेअंतर्गत २२ हजार १२२ कोटींंच्या पॅकेजची घोषणा वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता. २०) केली. येत्या वर्षभरात या योजनांची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस असल्याचे ते म्हणाले.

नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या विभागांचा सर्वांगीण विकास ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. या विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पूरक व्यवसाय उपलब्ध करत तसेच रोजगारनिर्मितीसाठी विशेष योजनेअंतर्गत २२ हजार १२२ कोटींंच्या पॅकेजची घोषणा वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता. २०) केली. येत्या वर्षभरात या योजनांची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस असल्याचे ते म्हणाले.

वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की धान हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, नागभिड, ब्रह्मपुरी येथे ४ ‘ब्राऊन राईस प्रासेसिंग क्लस्टर’ तयार करण्यात येणार आहेत. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांनी ब्लॅक राईसमध्ये कॅन्सर विरोधी गुण असल्याचे संशोधनाअंती निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना ‘आत्मा’ या योजनेच्या माध्यमातून ब्लॅक राईसचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आमचे नियोजन आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी उत्पादन संस्थांना शेतमालाच्या मूल्यवर्धनांकरीता प्रत्येकी २५ लाख इतके भांडवल उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असून त्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्थांना कृषी प्रकिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल. अमरावती व अकोला जिल्ह्यामध्ये नावीन्यपूर्ण असा ‘वावर उपक्रम’ राबविणार आहे. कृषी विपणनच्या विविध उपक्रमांसाठी १२५ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. चांगल्या प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन होण्यासाठी उच्च प्रतीचे बियाणे आवश्यक असते.  उच्च प्रतीच्या बियाणे निर्मीतीसाठी २१ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कृषी यांत्रिकीकरण सुविधांसाठी ५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकी ५० कोटी प्रमाणे एकूण १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विदर्भ व मराठवाड्यातील एकूण १९ जिल्ह्यांसाठी १० शेळ्या व १ बोकड याप्रमाणे १९००० गट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. या योजनेंतर्गत शासनामार्फत ५० टक्के अनुदान देण्यात येईल.  
 


इतर अॅग्रो विशेष
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
शेती बदलते आहे कूस!पुणे  ः गेल्या आठ ते दहा वर्षांत...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...
सुगंधी जिरॅनियम शेतीसह प्रक्रियेलाही...ऊस, आले, हळद, भात, बाजरी, स्ट्रॅाबेरी इ. प्रमुख...
विक्री तंत्रांमध्ये होतोय बदलशेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही...
चव, रंगाचे वैशिष्ट्य राखून असणारा...सोलापूरसारख्या दुष्काळी भागात डाळिंब,...
विक्री व्यवस्थेत बदल करून शेतकऱ्यांनीच...अलीकडील वर्षांत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन विक्री...
फूलशेतीतून मिळाली नवी दिशासांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष,...
लिंबाच्या ‘क्लस्टरने सुधारले अर्थकारणपरभणी जिल्ह्यातील राधेधामणगाव (ता.सेलू) तसेच...
सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ९२५०...नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
‘आरबीआय’चे नियंत्रण सहकार मोडीत...सातारा : सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे...
खरिपाची ३१५ लाख हेक्टरवर पेरणी नवी दिल्ली: यंदा देशभरात मॉन्सून वेळेआधीच दाखल...
खानदेशात मृग बहारातील केळी लागवड...जळगाव ः खानदेशात मृग बहार (जून व जुलैमध्ये लागवड...
डाळिंबाच्या विम्याचे पैसे वर्षानंतरही...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या हवामानावर...
सदोष बियाणे उत्पादक कंपन्यांनी भरपाई...अमरावती: सदोष बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या...
बंदरात अडकलेल्या आयात वस्तू सोडा पुणे : चीनमधून आयात होत असलेल्या सुट्या भागांचे...
बारा हजार कोटींची कीडनाशकांची बाजारपेठ...पुणे : केंद्र शासनाने कीटकनाशकांवर आणलेल्या...
पणन संचालकांसह परभणी जिल्हा ...औरंगाबाद ः जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या...
सोयाबीनची उगवण न झाल्याने जड अंतकरणाने...अकोला ः बियाण्याचा दर्जा, पावसाचा खंड व इतर...