विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली बत्तीसवर

नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या ‘कोरोना’ बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे विदर्भातील बाधितांची संख्या ३२ तर मृतांची संख्या तीनवर पोचली आहे.
In Vidarbha, the number of Corona obstacles reached thirty-two
In Vidarbha, the number of Corona obstacles reached thirty-two

नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या ‘कोरोना’ बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे विदर्भातील बाधितांची संख्या ३२ तर मृतांची संख्या तीनवर पोचली आहे. 

विदर्भात सुरक्षाविषयक उपायांकडे लक्ष्य देण्यात आले आहे. प्रशासन स्तरावर देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, काहींच्या बेजबाबदार वागण्याचा त्रास गाव शहरातील बहतांश नागरिकांना बसत असल्याचे चित्र आहे. नागपुरात बाधितांची संख्या वाढली असली तरी आजवर कोणाचा मृत्यू झाला नव्हता. 

नागपूरमध्ये ५२० जणांना क्‍वारंटाइन करण्यात आले आहे तर यापूर्वी ७४७ डिस्चार्ज झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात एकही बाधीत दगावल्याची नोंद नव्हती असे असताना सतरंजीपूरा भागातील एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला. त्याचे नमुने तपासणीअंती पॉझिटिव्ह  आले. 

वसाहतीतील एका डॉक्‍टरकडून त्याने तपासणी केली होती. त्यांच्या कुटुंबात पाच लोक आहेत. हे सर्व एका छोट्याशा खोलीत राहतात. नागपुरातील या पहिल्या ‘कोरोना’बाधिताच्या मृत्यूनंतर विदर्भात एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या तीनवर पोचली आहे. त्यामध्ये नागपूर, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com