विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवर

नागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली आहे. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत दर ५७०० रुपयांवर पोचले आहेत.
 In Vidarbha, the price of tur reached six thousand
In Vidarbha, the price of tur reached six thousand

नागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली आहे. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत दर ५७०० रुपयांवर पोचले आहेत. अमरावतीत तूरीचे दर ५३०० ते ५७५० रुपये आणि कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीत तूरीला उच्चांकी सहा हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. गेल्या आठवड्यात तूरीचे दर नागपूर बाजार समितीत अवघे ४६०० ते ५४२२ रुपये इतके होते. 

प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने विदर्भातील मुख्य बाजारात तूरीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली आहे. नागपूर बाजार समितीत गेल्या आठवड्यात तूरीची आवक अवधी ५८४ क्‍विंटल होती. या आठवड्यात आवक ६२७ वर पोचली, तर दरही काहिसे वधारले. ४६०० ते ५४२२ वरुन दर थेट ५५०० ते ५८०० रुपये झाले. सरबती गव्हाचे दर गेल्या आठवड्यात २४०० ते ३००० रुपयांप्रमाणे होते. या आठवड्यात गव्हाचे दर २४०० ते २८०० रुपयांपर्यंत खाली आले. गव्हाची आवक ५०० क्‍विंटलची आहे. तांदूळ दर ४२०० ते ४५०० रुपयंवर स्थिर आहेत. तांदळाची आवक २०० क्‍विंटलची असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

हरभरा आवक ३००० क्‍विंटलची आहे. ३६०० ते ४१७५ रुपये क्‍विंटलने हरभऱ्याचे गेल्या आठवड्यात व्यवहार झाले. या आठवड्यात हरभरा दर ३६०० ते ४२२८ रुपये होते. भुईमूंग शेंगांची आवक देखील बाजारात नियमीत आहे. गेल्या आठवड्यात ३५०० ते ३६०० रुपये क्‍विंटल असलेली शेंग या आठवड्यात ४००० ते ४२०० रुपयांवर पोचली. बाजारात सोयाबीन आवक सरासरी १००० क्‍विंटलची आहे. ३४०० ते ३७३० रुपये असा दर असून गेल्या आठवड्यात देखील अशीच स्थिती होती. 

डाळिंबांचे दर २००० ते ६००० रुपयांवर स्थिर असून आवक १५०० क्‍विंटल होती. तोतापल्ली आंबा १८०० ते २४०० रुपये आणि आवक २००० क्‍विंटलची होती. बटाटा आवक ३८७६, तर दर १६०० ते २००० रुपये, कांदा आवक १४८८ क्‍विंटल आणि दर १००० ते १३०० रुपये याप्रमाणे होते. लसून दर ५००० ते ७००० रुपये क्‍विंटल आणि आवक ८२२ क्‍विंटलची आहे. हिरव्या मिरचीची आवक १५४ क्‍विंटल आणि दर १५०० ते २००० रुपये मिळाले. 

कारंजा बाजार समितीत दराचा उच्चांक

वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तूरीने चांगलाच उच्चांक गाठला. या ठिकाणी कमीतकमी ५५०५, तर जास्तीत जास्त ५९५५ रुपये असा दर तूरीला मिळाला. दोन दिवसांपूर्वी याच बाजार समितीत तूरीला उच्चांकी सहा हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. तूरीची आवक २ हजार क्‍विंटलची आहे. अमरावती बाजार समितीत तूरीचे दर ५३०० ते ५७५० रुपये इतके राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com