Agriculture news in marathi In Vidarbha, the purchase of government tires was delayed | Agrowon

विदर्भात शासकीय तूर खरेदी रखडली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 मार्च 2021

खासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामुळे मार्च महिना उजाडल्यानंतरही जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्रांवर खरेदीचा आकडा कमीच आहे.

यवतमाळ : खासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामुळे मार्च महिना उजाडल्यानंतरही जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्रांवर खरेदीचा आकडा कमीच आहे. हमीभाव केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी दरात तफावत असल्याने शेतकरी खासगी बाजारात तुरीची विक्री करीत आहेत. 

शासनस्तरावरून तूर खरेदीच्या प्रक्रियेला यंदा लवकरच सुरुवात झाली. नोंदणी करून शेतकऱ्यांना तूर आणण्याची माहिती दिली जात आहे. मात्र, हमीभावापेक्षा खासगी बाजारात तुरीचे दर अधिक आहेत. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहेत. खासगी बाजारात तुरीला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

या ठिकाणी तुरीची आवक वाढली आहे. कापूस, सोयाबीननंतर तूर उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. दर वर्षी साधारणतः तुरीची शासकीय खरेदी सात लाख क्विंटलपर्यंत पोहोचते. त्यामुळेच तुरीच्या खरेदीचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण होते. 

यंदा दुष्काळाचे वर्ष पाहता दोन लाख क्विंटल तूर खरेदीचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेली तूर ठेवण्यासाठी चार लाख पोत्यांचे नियोजन करून ठेवण्यात आलेले आहे. मात्र, शेतकरी शासकीय केंद्रांवर फिरकले नसल्याने यंदा खरेदीचे काम पडले नाही. खासगी बाजारात तुरीला अधिक दर मिळत आहे. शिवाय, पैसे नगदी असल्याने शेतकऱ्यांनी खासगीला पसंती दिली आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाचे सात गोदामे आहेत. त्यात यवतमाळ येथे तीन, मारेगाव, आर्णी, पुसद व उमरखेड येथील एका गोदामाचा समावेश आहे. जिल्ह्यात महागाव, पांढरकवडा, नेर, आर्णी, पुसद, मारेगाव, दारव्हा, बाभूळगाव व दिग्रस या नऊ ठिकाणी नोंदणी करण्यात आली. 

हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी 
जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर जवळपास ४० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. खासगी बाजारात तुरीचे दर जास्त असल्याने ‘नाफेड’कडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे अजूनही अनेक शासकीय केंद्रांवर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे. 

प्रतिक्रिया
‘नाफेड’ची शासकीय तूर खरेदी सुरू झाली आहे. खासगीत चांगले दर आहेत. चुकारे नगदी आहेत. त्यामुळे यंदा आम्ही ‘नाफेड’ऐवजी खासगीला पसंती दिली. शेतकऱ्यांना यंदा अनेक अडचणींमुळे आर्थिक फटका बसला. तुरीला चांगले भाव मिळत असल्याने थोडा दिलासा आहे. 
- राहुल पाटील, शेतकरी, बाभूळगाव.


इतर ताज्या घडामोडी
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....