agriculture news in marathi, vidarbha in rain comeback | Agrowon

विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने विदर्भात सर्वदूर वापसी केली. भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६४ मिमी इतक्‍या पावसाची नोंद करण्यात आली. भंडारासोबतच अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली.

नागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने विदर्भात सर्वदूर वापसी केली. भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६४ मिमी इतक्‍या पावसाची नोंद करण्यात आली. भंडारासोबतच अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली तसेच चंद्रपूर या जिल्ह्यात भात लागवड होते. उर्वरित सहा जिल्ह्यामध्ये कपाशी, सोयाबीन यासारख्या पारंपरिक पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहतो. विदर्भात सर्वदूर गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. धान उत्पादक जिल्ह्याची स्थिती, तर फारच विदारक झाली होती. संरक्षित सिंचनाचे पर्यायदेखील मर्यादित असल्याने धान पीक वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या होत्या.

कापूस, सोयाबीन हे पीक काही ठिकाणी फुलोरा, तर काही ठिकाणी बोंड आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत असल्याने या पिकाला या वेळी पाण्याची गरज राहते. त्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादकांची चिंतादेखील वाढीस लागली होती. दरम्यान बुधवारी (ता. १५) रात्रीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाने कमबॅक केले. पावसाच्या हजेरीने पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली आहे.

‘२३ जुलैपासून पाऊसच झाला नाही. हा इतका खंड पिकांना सोसवत नाही. त्यामुळे पावसाची गरज होती. आता पेंडकोणी पाऊस झाला असून, पिकाची पाण्याची गरज संपली नाही. मृग बहरातील संत्री लहान आकाराची आहेत. शेतकऱ्यांनी नत्र खताचा डोस दिला असेल, अशा बागांसाठी हा पाऊस पोषक आहे. त्यासोबतच कपाशी, सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांनाही हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.’
- रमेश चिजकार, प्रयोगशील शेतकरी, नागझिरी, ता. वरुड, जि. अमरावती


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...